Join us

Taapsee Pannu: 'बायकॉट'चा धक्का... आमीरनंतर तापसीलाही फटका, 'दोबारा'ची ओपनिंग अवघ्या काही लाखांत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 9:29 AM

1 / 12
अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap)4 वर्षांनंतर एकत्र आले आहेत. त्यांचा 'दोबारा' हा एक सायन्स फिक्शन थ्रिलर आहे. शुक्रवार 19 ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने 1 कोटीचाही आकडा गाठला नाही.
2 / 12
या चित्रपटाला स्क्रिनिंगमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि समीक्षकांकडूनही या चित्रपटाला खूप चांगले रिव्ह्यू मिळाले होते. रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटला बॉक्स ऑफिसवर बराच संघर्ष करावा लागतो आहे.
3 / 12
तापसी पन्नूसोबत या चित्रपटात पावेल गुलाटी आणि राहुल भट यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. रिपोर्ट्सनुसार, तापसी आणि अनुरागच्या 'दोबारा' चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी थिएटरमध्ये फक्त २-३ टक्के प्रेक्षक संख्या अनुभवली.
4 / 12
उत्तम स्टारकास्ट असूनही या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. त्यामुळे 'दोबारा'चे पहिल्याच दिवशी अनेक शो वेगवेगळ्या थिएटरमध्ये रद्द करण्यात आले. केवळ 275 ते 300 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडून फारशी आशा उरलेली नाही.
5 / 12
एकीकडे बायकॉट ट्रेंड सुरू असल्याने आमीर खानचा लालसिंग चढ्ढा हा सिनेमा चांगलाच आपटला असून कमाईच्या बाबतीतही तो मागे पडला आहे. त्यातच, आता तापसीच्या दोबारा या चित्रपटालाही पहिल्या दिवशी केवळ 72 लाख रुपयांची ओपनिंग मिळाली आहे.
6 / 12
तापसी ही बॉलिवूडमधील ए-लिस्ट अभिनेत्रींपैकी एक आहे, जी एका वर्षात सर्वाधिक चित्रपट करते. तिचा 'थप्पड' लॉकडाऊनच्या अगदी आधी रिलीज झाला होता, तर 'हसनी दिलरुबा', 'रश्मी रॉकेट' आणि 'लूप लपेटा' लॉकडाऊन दरम्यान OTT वर रिलीज झाले होते.
7 / 12
तापसी आणि अनुरागला 'दोबारा' चित्रपटाकडून मोठी अपेक्षा होती, मात्र दोघांचीही मोठी निराशा झाली आहे. कारण, संपूर्ण आठवड्यातच चित्रपटाला कमाईत मोठा आकडा गाठता आला नाही. प्रदर्शनाच्या 4 थ्या दिवशी चित्रपटाने केवळ 35 लाख रुपयांची कमाई केली असून गेल्या आठवडाभरात केवळ 3.37 कोटी रुपयांवर आकडा पोहोचला आहे.
8 / 12
प्रदर्शनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्यादिवशी केवळ सिनेमाला 1 कोटीचा आकडा पार करता आला आहे. दुसऱ्या दिवशी केवळ 1.02 कोटी रुपये आणि तिसऱ्यादिवशी 1.24 रुपये कमाई चित्रपटाने केली आहे. त्यामुळे, चित्रपटासाठी खर्च झालेला पैसाही निघणे कठीण बनले आहे. दाबोरा या चित्रपटासाठी 35 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
9 / 12
सध्या सोशल मीडियावर बायकॉट हा ट्रेंड सुरू असून आमीर खानच्या लालसिंग चढ्ढा चित्रपटाला या ट्रेंडचा जबरदस्त फटका बसला आहे. त्यामुळेच, कमाईवर मोठा परिणाम झाला असून चित्रपटगृहाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. त्यानंतर दोबारा चित्रपटही पडला. त्यावर, अनुराग कश्यपने भाष्य केलं आहे.
10 / 12
हिंदी चित्रपटसृष्टीवर बहिष्कार टाकून हा उद्योग टिकणार नाही असे वाटते का. मिठाई खाऊ नका असे डॉक्टर सांगतात, मग मिठाई बनवणे बंद झाले? लोकांना मधुमेहाचा त्रास होत असेल तर मिठाई बनणे बंद झाले? कोणावर बहिष्कार टाकल्याने माझे आयुष्य संपणार नाही. माझ्याकडे खूप काम आहे, मी आयुष्यात कधीही बेरोजगार राहणार नाही, असे अनुराग कश्यपने म्हटले आहे.
11 / 12
'मी शिकवायचो तेव्हा इतके पैसे मिळवायचो जे अनेक शिक्षकांना मिळत नाहीत. मी कोणत्याही देशात जाऊन काहीही शिकवू शकतो. मी या देशातही शिकवू शकतो. बहिष्कार टाकून माझे आयुष्य संपणार नाही. माझे चित्रपट चालले नाहीत, यात ते त्यांना आनंद मिळतो. उद्या चित्रपट Netflix वर येईल. तापसीच्या चित्रपटावर बहिष्कार टाकला पण तो नेटफ्लिक्सवर ट्रेंड झाला. माझ्या अनेक चित्रपटांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे.'
12 / 12
'सोशल मीडियापासून मेनस्ट्रीम मीडियामीपर्यंत बॉयकॉट ट्रेंड सुरू आहे. मीडियामध्ये नकारात्मक क्लिकबेट जास्त चालतात. ज्यांना चित्रपट बघायचा आहे ते बघतील, ज्यांना बघायचा नाही ते बघणार नाहीत. मी सुरुवातीच्या काळात 10 वर्षे रस्त्यावर होतो, तेव्हा तुम्ही कुठे होता? माझ्या चित्रपटांवर बंदी घातली जायची तेव्हा कुठे होतात? माझे असे कोणते चित्रपट आहेत जे तुम्ही सिनेमागृहात पाहिले आहेत? तुम्ही ते डाउनलोड करूनच पाहिले आहेत. माझा तुमच्या आणि तुमचा माझ्या आयुष्यावर अधिकार नाही,'असंही अनुराग म्हणाला.
टॅग्स :लाल सिंग चड्ढातापसी पन्नूआमिर खान