गेल्या १३ वर्षापासून 'हा' व्यक्ती करतो जेठालालचे सतरंगी शर्टचे डिझाइन, जाणून घ्या त्याच्याविषयी या खास गोष्टी By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 04:28 PM 2021-02-15T16:28:00+5:30 2021-02-15T16:37:18+5:30
अनेकदा केवळ पडद्यावर दिसणार-या कलाकारांचे मेहनतीला दाद दिली जाते. मात्र त्या कलाकाराला रसिकांपर्यंत पोहचण्यासाठी पडद्यामागे अनेक लोक काम करत असतात. कलाकारांच्या ड्रेसिंग स्टाइल दरवेळी आकर्षणाचा विषय ठरतो. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत अभिनेता दिलीप जोशीने जेठालालच्या भूमिकेतून तर रसिकांची पसंती मिळवलीच आहे.
मात्र त्याची ड्रेसिंग स्टाइलचेही लोक दिवाने आहेत. अनेकजण जेठालालची शर्टची स्टाइलने प्रभावित होत त्याच्यासारखे शर्ट परिधान करताना दिसतात.
आज जेठालाल केवळ भूमिकेमुळे नाही तर त्याच्या स्टायलिश शर्टमुळेही चर्चेत असतो.
जेठालालचे हे शर्ट बनवण्यासाठी एक व्यक्तीची खास मेहनत आहे.
गेल्या १३ वर्षापासून जेठालालचे शर्ट मुंबईतील जीतू भाई लखानीच डिझाइन करतात.
जेव्हा जेव्हा शोमध्ये नवीन विशेष भाग शूट करायचा असतो तेव्हा विशेष व्यवस्था केली जाते.
त्यानुसार 3 ते 2 तासात जेठालालचा शर्ट डिझाइन केला जातो.
आजघडीला अनेक लोक दिलीप जोशीला जेठालाल याच नावाने ओळखतात.
‘पंछी एक डाल के’ या मालिकेतून दिलीपला टीव्हीवर पहिला ब्रेक मिळाला. यानंतर तो ‘जरा हटके’ या शोमध्येही त्याची वर्णी लागली.
पुढे 'हम आपके है कौन', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'खिलाडी 420', 'वन टू का फोर' अशा काही चित्रपटातही त्याने काम केले.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ च्या एका एपिसोडसाठी दिलीपला आज दीड लाख रूपये मिळतात. तो महिन्यातून सुमारे 25 दिवस काम करतो.
2008 मध्ये दिलीप जोशीला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो मिळाला.याच शोने त्याला आज एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.