गेल्या १३ वर्षापासून 'हा' व्यक्ती करतो जेठालालचे सतरंगी शर्टचे डिझाइन, जाणून घ्या त्याच्याविषयी या खास गोष्टी By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 4:28 PM1 / 12 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत अभिनेता दिलीप जोशीने जेठालालच्या भूमिकेतून तर रसिकांची पसंती मिळवलीच आहे. 2 / 12मात्र त्याची ड्रेसिंग स्टाइलचेही लोक दिवाने आहेत. अनेकजण जेठालालची शर्टची स्टाइलने प्रभावित होत त्याच्यासारखे शर्ट परिधान करताना दिसतात. 3 / 12आज जेठालाल केवळ भूमिकेमुळे नाही तर त्याच्या स्टायलिश शर्टमुळेही चर्चेत असतो. 4 / 12जेठालालचे हे शर्ट बनवण्यासाठी एक व्यक्तीची खास मेहनत आहे. 5 / 12गेल्या १३ वर्षापासून जेठालालचे शर्ट मुंबईतील जीतू भाई लखानीच डिझाइन करतात. 6 / 12जेव्हा जेव्हा शोमध्ये नवीन विशेष भाग शूट करायचा असतो तेव्हा विशेष व्यवस्था केली जाते. 7 / 12 त्यानुसार 3 ते 2 तासात जेठालालचा शर्ट डिझाइन केला जातो. 8 / 12आजघडीला अनेक लोक दिलीप जोशीला जेठालाल याच नावाने ओळखतात.9 / 12‘पंछी एक डाल के’ या मालिकेतून दिलीपला टीव्हीवर पहिला ब्रेक मिळाला. यानंतर तो ‘जरा हटके’ या शोमध्येही त्याची वर्णी लागली. 10 / 12पुढे 'हम आपके है कौन', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'खिलाडी 420', 'वन टू का फोर' अशा काही चित्रपटातही त्याने काम केले.11 / 12 ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ च्या एका एपिसोडसाठी दिलीपला आज दीड लाख रूपये मिळतात. तो महिन्यातून सुमारे 25 दिवस काम करतो.12 / 12 2008 मध्ये दिलीप जोशीला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो मिळाला.याच शोने त्याला आज एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications