PHOTOS : -अन् भर कार्यक्रमात तब्बूने केलं अजय देवगणला KISS, बघण्यासारखा होता ‘भोला’चा चेहरा By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 2:58 PM1 / 9तब्बू आजही अविवाहित आहे आणि याला अजय देवगण जबाबदार आहे. खुद्द तब्बूने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. अर्थात मस्करीत... 2 / 9“मी जेव्हा लहान होती, तेव्हा माझा चुलत भाऊ समीर आणि अजय माझा सतत पाठलाग करायचे. माझ्याशी एखादा मुलगा बोललातर ते त्याला मारायचे. त्यांच्यामुळेच मी आजपर्यंत सिंगल आहे,”असं तब्बू म्हणाली होती.3 / 9हा सगळा मस्करीचा भाग होता. पण रिअल लाईफमध्ये तब्बू व अजय देवगणची मैत्री सगळ्यांनाच ठाऊक आहेत. तब्बू व अजय दोघंही बालपणापासूनचे मित्र आहेत आणि आजही त्यांची मैत्री कायम आहे.4 / 9‘भोला’ या चित्रपटाच्या टीझर लॉन्च इव्हेंटमध्येही दोघांची ही मैत्री पाहायला मिळायला. या इव्हेंटला अजय व तब्बू दोघांनीही एकत्र एन्ट्री मारली.5 / 9याचदरम्यान असं काही घडलं की, सगळेच थक्क झालेत. होय, भरस्टेजवर तब्बूने अजयच्या गालावर किस केलं. याचे फोटो क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाले नसतील तर नवल.6 / 9अजय व तब्बू दोघंही मस्करीच्या मूडमध्ये होते. मस्करी मस्करीत तब्बूने आधी अजयच्या खांद्यावर हात ठेवला आणि मग अचानक त्याच्या गालावर किस केलं. यावेळी अजयचा चेहरा बघण्यासारखा होता.7 / 9अजय व तब्बूने अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. तब्बू हे आपल्यासाठी लकी असल्याचं अजय म्हणतो.8 / 9अलीकडे अजय व तब्बूचा दृश्यम २ रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.9 / 9आता अजय व तब्बू ‘भोला’ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. येत्या ३० मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. आणखी वाचा Subscribe to Notifications