Fateh Randhawa : चर्चा तब्बूच्या भाच्याची... अभिनेत्री फराह नाजचा लेक फतेह दिसतो फारच हँडसम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 16:14 IST
1 / 8तब्बूला कोण ओळखत नाही. ९०चं दशक गाजवणारी तब्बू आजही बॉलिवूडमध्ये ॲक्टिव्ह आहे. तब्बूला एक मोठी बहिणही आहे. तिचं नाव फराह नाज. फराह ही सुद्धा एकेकाळी मोठी अभिनेत्री होती. पण आज आम्ही फराहच्या मुलाबद्दल सांगणार आहोत.2 / 880 व 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये फराह अॅक्टिव्ह होती. ती आली आणि थोडी थोडकी नव्हे तर सुमारे 20 वर्ष इंडस्ट्रीत वावरली. पण तिला म्हणावं तसं यश लाभलं नाही. यानंतर अचानक लग्न करून ती इंडस्ट्रीतून गायब झाली झाली. याच फराहचा मुलगा फतेह प्रचंड हँडसम आहे.3 / 8तब्बूचा भाचा आणि फराहचा मुलगा फतेह रंधावा सोशल मीडियावर बराच ॲक्टिव्ह आहे. तो विंदू दारा सिंगचा मुलगा आणि अभिनेते दारा सिंग यांचा नातू आहे.4 / 8फतेह रंधावा हिरोपेक्षा कमी नाही. त्याचे फोटो पाहून अनेकजण त्याला बॉलिवूडचा पुढचा सुपरस्टार म्हणू लागले आहेत.5 / 8मध्यंतरी करण जोहर फतेहला लॉन्च करणार अशी चर्चा होती. करणच्या दोस्ताना २ मधून फतेहचा डेब्यू होणार असं म्हटलं गेलं होतं. अर्थात पुढे दोस्ताना २ बद्दलच्या बातम्या हवेत विरल्या.6 / 8फराहने विंदू दारा सिंगसोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर वर्षभरात विंदू व फराहच्या घरी पाळणा हलला. सुरूवातीची काही वर्ष आनंदात गेलीत. पण अचानक दोघांत बिनसलं. इतकं की, 2002 मध्ये फराह मुलगा फतेह घेऊन दुसरीकडे राहायला लागली.7 / 82003 मध्ये फराहने अभिनेता सुमीत सहगलसोबत दुसऱ्यांदा संसार थाटला.आता ती आपल्या पतीसमवेत मुंबईत राहते आणि त्याच्या डबिंग कंपनीत त्याला मदत करते.8 / 8पहिल्या लग्नापासून फराहला एक मुलगा तर सुमीत सहगलला एक मुलगी आहे. सुमीतची मुलगी सायशा सहगल ही एक अभिनेत्री आहे.