Join us  

Vicky Kaushal Katrina Kaif : विकी व कॅटच्या मेहंदी व संगीत सेरेमनीचे फोटो एकदा पाहाच, पाहून म्हणाल WOW!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 2:24 PM

1 / 9
विकी कौशल व कतरिना कैफच्या लग्नाचे आणि हळदीचे फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आता मेहंदी आणि संगीत सेरमेनीचे फोटो समोर आले आहेत.
2 / 9
होय, विकी व कॅटने मेहंदी आणि संगीत सेरेमनीचे काही सुंदर फोटो आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत.
3 / 9
हे फोटो दृष्ट लागावी इतके सुंदर आहेत. संगीत सेरेमनीत विकी व कॅट नुसती धम्माल करत आहेत.
4 / 9
मेहंदी ता सजदी जब नाचे सारा टब्बर...या कॅप्शनसह कतरिनाने हे फोटो शेअर केले आहेत. फोटोत पती व सास-यांसोबत कॅट नाचताना दिसतेय.
5 / 9
ग्रीन, पिंक, रेड, यॅलो अशा मल्टी कलर लेहंग्यात कतरिना कमालीची सुंदर दिसतेय. तिच्या हातावर विकीच्या नावाची मेहंदी सजलेली दिसतेय.
6 / 9
विकी कौशलने कुर्ता आणि त्यावर मल्टी कलर जॅकेट घातलं आहे. बॉलिवूडच्या गाण्यांवर विकी व कॅट थिरकताना दिसत आहेत.
7 / 9
विकी व कॅटच्या लग्नाचे फोटो आधीच व्हायरल झाले होते. काही मिनिटांत या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले होते.
8 / 9
आता मेहंदी व संगीत सेरेमनीचे फोटोही तुफान व्हायरल होत आहेत. चाहते हे फोटो पाहून अक्षरश: क्रेझी झाले आहेत.
9 / 9
कतरीना कैफ, विकी कौशल राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे दोन दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकले. त्यांच्या कपड्यांपासून, दागिने, लग्नातला मेनू आणि हळदीपासून सगळ्या गोष्टींची खूप चर्चा झाली.
टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल