IN PICS : भावा तुला सरकारी नोकरी आहे का रे? रोमॅन्टिक फोटो शेअर करताच साऊथचं जोडपं झालं ट्रोल By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 5:02 PM1 / 11गेल्यावर्षी लोकप्रिय अभिनेत्री महालक्ष्मी ( Mahalakshmi ) हिने निर्माता रवींद्र चंद्रशेखरन ( Ravindar Chandrasekaran)सोबत लग्नगाठ बांधली. तेव्हापासून ही जोडी चर्चेत आहे.2 / 11आता लग्नाच्या ४ महिन्यानंतर ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या कपलने एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला व अनेकांनी त्यांना ट्रोल करायला सुरूवात केली.3 / 11रवींद्र चंद्रशेखरन यांनी लग्नाला ४ महिने पूर्ण झाल्यानिमित्त महालक्ष्मीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो हा माझा आनंद नाहीये तर तू माझ्यासाठी जगतेयस हा माझा आनंद आहे, असं त्यांनी या फोटोसोबत लिहिलंय.4 / 11पण रवींद्र यांची पोस्ट अन् त्यांनी शेअर केलेला फोटो लोकांच्या पचनी पडला नाही. मग काय अनेकांनी यावरून या कपलला ट्रोल करायला सुरूवात केली.5 / 11अनेकांनी महालक्ष्मीच्या पतीच्या दिसण्यावरून नको त्या कमेंट्स केल्या. महालक्ष्मी सारख्या इतक्या सुंदर अभिनेत्रीने रवींद्रसोबत लग्न केलंच कसं? असा सवाल अनेकांनी केला.6 / 11 काहींनी महालक्ष्मीवर पैशासाठी लग्न केल्याचा आरोपही केला. पैशापुढे सगळं झूठ आहे, अशा कमेंट्स करत लोकांनी तिला ट्रोल केलं.7 / 11भावा तुला सरकारी नाेकरी आहे का? पैसा आहे तर सगळं काही शक्य आहे. पैसा बोलतो, अशा कमेंटस काही युजर्सनी केल्यात.8 / 11महालक्ष्मीचं हे दुसरं लग्न आहे. पहिल्या पतीपासून तिला एक मुलगा आहे. महालक्ष्मी ही तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.9 / 11 तिने अनेक मालिका आणि चित्रपटात काम केलं आहे. व्हिडीओ जॉकी म्हणून तिने आपल्या कारकिदीर्ची सुरुवात केली होती. त्यानंतर ती सिनेसृष्टीत पदार्पण केलं.10 / 11 वाणी रानी, चेल्लामय, अरसी, थिरू मंगलम, यामिरूक्का बयामेन अशा अनेक चित्रपटांत महालक्ष्मी झकळली.11 / 11महालक्ष्मीचा पती रवींद्र चंद्रशेखरन तमिळ निर्माता आणि दिग्दर्शक आहे. नालनम नंदिनीयम, सुट्टा कधई, मुरुंगकाई चिप्स अशा अनेक चित्रपटाची निर्मिती त्याने केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications