'तान्हाजी' फेम शरद केळकरची पत्नीदेखील आहे मराठमोळी अभिनेत्री, पहा त्यांचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 07:00 IST
1 / 11शरद केळकरने आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. तान्हाजी या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला होता.2 / 11शरद केळकरच्या पत्नीचे नाव किर्ती गायकवाड केळकर असून ती देखील एक अभिनेत्री आहे.3 / 11'आक्रोश' या मालिकेत शरद आणि किर्ती यांनी सगळ्यात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. पण 'सात फेरे' या मालिकेमुळे शरद आणि किर्ती यांची जोडी घराघरांत पोहोचली.4 / 11पहिल्याच भेटीत शरदला किर्ती आवडली होती. किर्ती ही माझ्यासाठी 'लकी चार्म' आहे, असं शरद म्हणतो.5 / 11 किर्तीला भेटल्यावर मला 'सात फेरे' आणि 'सिंदूर तेरे नाम का' असे मोठे प्रोजेक्ट्स मिळाले, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.6 / 11२००५ साली शरद आणि किर्ती रेशीमगाठीत अडकले.7 / 11किर्ती आणि शरद यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. 8 / 11आपल्याला शरदच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर किर्तीसोबतचे अनेक फोटो पाहायला मिळतात.9 / 11शरद आणि किर्ती यांना एक मुलगी असून तिचे नाव किशा आहे. 10 / 11किशाचे अनेक फोटो आपल्याला किर्ती आणि शरदच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात.11 / 11किशा ही खूपच क्यूट असून त्या दोघांचीही ती प्रचंड लाडकी आहे. किर्तीने अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या असल्या तरी गेल्या काही वर्षांपासून ती अभिनयक्षेत्रापासून दूर आहे.