tara sutaria bold avtaar at The grand finale of Bombay Times Fashion Week
परी हूं मैं! रॅम्पवर तारा सुतारियाचा जलवा, सर्वांची नजर खिळली तिच्या अदांवर! By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 07:37 PM2020-03-16T19:37:29+5:302020-03-16T19:46:47+5:30Join usJoin usNext तारा नुकतीच 'बॉम्बे टाईम्स फॅशन वीक'च्या ग्रँड फिनालेची शो स्टॉपर झाली होती. तारा फॅशन डिझायनर सुलक्षणा मोंगा यांच्या शो ची शो स्टॉपर बनली होती. या कार्यक्रमात ताराने सफेद रंगाचा लेहेंगा घातला होता आणि यात ती अगदी परी सारखी दिसत होती. तारा इतकी छान दिसत होती की तिच्या या लूकवरून लोकांच्या नजरा हटत नव्हत्या. ताराने‘स्टुडंट आॅफ द ईअर 2’या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तारा अभिनेत्री तर आहेच शिवाय ती एक गायिका आणि डान्सर सुद्धा आहे. ताराने युकेमध्ये क्लासिकल बॅले डान्स, मॉर्डन डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सची ट्रेनिंग घेतली आहे. ताराने आपल्या लुक्ससोबतच आपल्या अॅक्टिंगद्वारा सर्वांच्या मनात आपल वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचबरोबर ताराने‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यांसारख्या चित्रपटांमध्ये डबिंगही केले आहे ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून 'डिज्नी'मध्येही काम देखील केले आहे. तारा तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर नेहमीच आपले हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करत असते. सोशल मीडियावर ताराचे खूपच चांगले फॅन फॉलॉव्हिंग आहे. तारा लवकरच 'आरएक्स 100' या हिंदी चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे.टॅग्स :बॉलिवूडतारा सुतारियाbollywoodTara Sutaria