या 19 वर्षाच्या बालेने हिना खान, मौनी रॉयलाही दिली मात; फोटो पाहून फिदा व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 14:42 IST
1 / 11छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौर म्हणायला फक्त 19 वर्षांची आहे. पण आत्तापासून मौनी रॉय व हिना खान सारख्या बड्या अभिनेत्रींना ती टक्कर देते.2 / 11अवनीतचे काही ग्लॅमरस फोटो सध्या व्हायरल होत आहेत. सोबत तिची फॅन फॉलोइंगही वाढते आहे.3 / 11अवनीत सध्या कोणत्याही शोचा भाग नाही. मात्र तरीही तिची चर्चा होते. तिची स्टाईल हीच तिची पर्सनॅलिटी बनली आहे.4 / 11फॅन फॉलोइंगच्या बाबतीत अवनीत मौनी व हिनाला जबरदस्त टक्कर देताना दिसतेय.5 / 11मौनीचे इन्स्टावर 15.6 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि हिना खानचे 10.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. अवनीतचे म्हणाल तर तिचे 16.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.6 / 11अवनीत सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. स्वत:चे रोज नवे फोटो ती शेअर करत असते.7 / 11चाहते अवनीतच्या सौंदर्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे अवनीतचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालतात. 8 / 11अवनीतने डान्स इंडिया डान्स- लिटील मास्टर या शोमधून करिअरला सुरूवात केली होती. सेमिफायनलआधीच ती या शोमधून बाद झाली होती. 9 / 11यानंतर डान्स के सुपरस्टार्स या रिअॅलिटी शोमध्येही तिने भाग घेतला. पुढे ती अॅक्टिंगमध्ये आली. मेरी मां, टेढे है पर मेरे है, सावित्री, एक मुठ्ठी आसमान या मालिकेत तिने काम केले.10 / 11अवनीत कौर ‘अलादीन- नाम तो सुना होगा’ या मालिकेत यासमीनची भूमिका साकारत होती. अवनीत एका दिवसासाठी 30 ते 35 हजार रुपये फीस घेते.11 / 11टीव्ही व्यतिरिक्त अवनीत कौर बॉलिवूडच्या करीब करीब सिंगल, मर्दानी चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात दिसली आहे.