'आई कुठे काय करते'मधून अचानक गायब झाली होती यशची गौरी, आता काय करते माहितीये का? By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 12:07 PM1 / 9'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील गाजलेल्या आणि लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. 2 / 9या मालिकेतील देशमुख कुटुंबीयांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. अरुंधतीप्रमाणेच या मालिकेतील इतर कलाकारांनाही पसंती मिळाली. 3 / 9'आई कुठे काय करते'मधील यश-गौरी ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या या जोडीवर प्रेक्षकही प्रेम करायचे. 4 / 9मालिकेत त्यांचा साखरपुडाही झाल्याचं दाखविण्यात आलं होतं. पण, त्यानंतर गौरी अचानक यशच्या आयुष्यातून निघून गेल्याचं दाखविण्यात आलं होतं. मालिकेतही त्यानंतर गौरी दिसली नाही. 5 / 9'आई कुठे काय करते'मध्ये अभिनेत्री गौरी कुलकर्णीने यशची गर्लफ्रेंड गौरीची भूमिका साकारली होती. या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. 6 / 9पण, मालिकेतून अचानक एक्झिट घेतलेली गौरी सध्या काय करते हे तुम्हाला माहितीये का? 7 / 9गौरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही ती चाहत्यांना देत असते. 8 / 9'आई कुठे काय करते' मालिकेनंतर आता गौरी सन मराठीवरील 'प्रेमास रंग यावे' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 9 / 9या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications