Join us

Fire हो तुम! 'आई कुठे...'मधील अरुंधतीचं हटके फोटोशूट, चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 2:34 PM

1 / 8
'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका. या मालिकेतील देशमुख कुटुंब आणि खास करून अरुंधतीला प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान आहे.
2 / 8
या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहोचली. 'आई कुठे काय करते' मालिकेने तिला वेगळी ओळख मिळवून दिली.
3 / 8
मधुराणी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतेच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
4 / 8
मधुराणीने जांभळ्या रंगाची साडी आणि लांब बाह्यांच्या प्रिंटेड ब्लाऊजमध्ये फोटोशूट केलं आहे.
5 / 8
कानात झुमके आणि केसांत गुलाब माळत तिने साधा लूक केला आहे. साध्या लूकमध्येही तिचं सौंदर्य खुलून आल्याचं दिसत आहे.
6 / 8
फोटोसाठी मधुराणीने खास पोझही दिल्या आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
7 / 8
मधुराणीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे.
8 / 8
मधुराणीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 'फायर हो तूम' अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
टॅग्स :मधुराणी प्रभुलकरआई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकार