Join us  

'आई कुठे काय करते'मधील संजनाचा नखरेल अंदाज, फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 4:52 PM

1 / 6
'आई कुठे काय करते' ही टीव्हीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतूनच अभिनेत्री रुपाली भोसले घराघरात पोहोचली.
2 / 6
या मालिकेत रुपाली सध्या संजना हे पात्र साकारत आहे. रुपालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
3 / 6
नुकतंच रुपालीने निळ्या रंगाच्या साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
4 / 6
खास मोराचं नक्षीकाम असलेला ब्लाऊज रुपालीने घातला आहे. मोराचं पीस घेत रुपालीने फोटोसाठी पोझ दिली आहे.
5 / 6
केसांत गुलाबाचं फूल माळून रुपालीने खास लूक केला आहे. तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
6 / 6
रुपालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
टॅग्स :रुपाली भोसलेआई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकार