Join us  

'अबीर गुलाल' मालिकेतील श्री-अगस्त्य झाले रोमँटिक, फोटोशूट पाहून चाहतेही पडले प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 3:47 PM

1 / 7
'अबीर गुलाल' मालिका कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका असून या मालिकेतील श्री-अगस्त्य या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळालीय
2 / 7
श्री-अगस्त्य ही मालिकाविश्वातील लोकप्रिय जोडी. 'अबीर गुलाल' मधील या दोघांच्या मैत्रीला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय
3 / 7
श्री-अगस्त्यच्या जोडीमध्ये अभिनेता अक्षय केळकर आणि अभिनेत्री पायल जाधव झळकत आहे.
4 / 7
'अबीर गुलाल' मालिकेतील श्री-अगस्त्यने खास फोटोशूट केलंय. यावेळी अक्षय केळकरने काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला असून पायलने पिवळ्या-लाल रंंगाची बॉर्डर असलेली साडी नेसली आहे
5 / 7
अगस्त्य-श्री अर्थात मालिकेतील अक्षय केळकर आणि पायल जाधव हे ऑफ कॅमेरा सुद्धा एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण आहेत
6 / 7
'अबीर गुलाल' मालिकेतील कलाकार अक्षय, पायल आणि अभिनेत्री गायत्री दातार नुकतेच बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये जाऊन आले
7 / 7
यावेळी अक्षय-पायलने स्पर्धकांसोबत खास खेळ खेळला. इतकंच नव्हे तर पायलने सूरज चव्हाणला राखी बांधली
टॅग्स :कलर्स मराठीमराठीमराठी अभिनेता