अभिनेत्री हृता दुर्गुळेनं प्रतीक शाहसोबत गुपचूप बांधली लग्नगाठ, पाहा त्यांच्या लग्नातील काही खास क्षण By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 9:53 AM1 / 10छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री ह्रता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि प्रियकर प्रतीक शाह (Prateek Shah) नुकतेच लग्नबेडीत अडकले आहेत.2 / 10हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांच्या लग्नाबद्दल फारसे कुणाला माहित नव्हते. या दोघांच्या लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि जवळता मित्रपरिवार उपस्थित होता.3 / 10हृता आणि प्रतीकचे १८ मे रोजी दुपारी लग्न पार पडले. त्यानंतर रात्री त्या दोघांनी लग्नाचा फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली.4 / 10या दोघांच्या लग्नाच्या फोटोवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. लग्नात या दोघांनी पारंपारिक लुक केला होता. 5 / 10 ह्रता दुर्गुळेने बॉयफ्रेंड प्रतीक शाह याच्याशी शुक्रवारी, २४ डिसेंबर २०२१ रोजी साखरपुडा केला होता. यानंतर आज तिने प्रतीकसोबत लग्नगाठ बांधल्याचे समोर आले आहे.6 / 10ह्रता दुर्गुळेने सोशल मीडियाच्या माध्यामातून प्रतीक शाहसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात.7 / 10प्रतीक हा हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. 8 / 10'तेरी मेरी इक जिंदडी', 'बेहद २', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' यासारख्या मालिकांचे दिग्दर्शन प्रतीकने केले आहे.9 / 10हृता दुर्गुळे हिने छोट्या पडद्यावर दुर्वा या मालिकेतून पदार्पण केले. त्यानंतर तिला खरी लोकप्रियता मिळाली ती फुलपाखरू या मालिकेतून.10 / 10हृताचे दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक लोकप्रिय झाले आहे. सध्या ती मन उडू उडू झाले या मालिकेत काम करते आहे. तसेच ती अनन्या या चित्रपटातही झळकणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications