छोट्या पडद्यावरुन गायब, ओटीटी माध्यमात आजमावतेय नशीब; तरी जगतेय आलिशान आयुष्य By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 2:00 PM1 / 8करिश्मा तन्ना (Karishma Tanna) टेलिव्हिजनवर लोकप्रिय अभिनेत्री आहे. लूक्स आणि अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत नाव कमावलं. काही महिन्यांपूर्वी आलेली तिची 'स्कूप' सीरिजही खूप गाजली. 2 / 8करिश्मा तन्नाने अनेक महिन्यांपासून टेलिव्हिजनपासून दूर आहे. तरी ती अतिशय लक्झरियस आयुष्य जगते. करिश्माचा इनकम सोर्स नक्की काय आहे?3 / 8करिश्मा सध्या टीव्हीवर दिसत नसली तरी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. तिने आतापर्यंत अनेक हिट मालिकांमध्ये काम केलं. 'क्यूँकी साँस भी कभी बहू थी', 'पालखी' या मालिकांमुळे ती लोकप्रिय झाली.4 / 8मीडिया रिपोर्टनुसार, करिश्मा तन्नाचं एकूण नेटवर्थ 41 कोटी रुपये आहे. दर महिन्याला ती 30 लाख रुपयांची कमाई करते. तिच्या लक्झरियस लाईफस्टाईलवरुन हे लक्षात येतं.5 / 8करिश्मा तन्नाने टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर झाल्यानंतर ब्रँड्स आणि पेड प्रमोशनमधून बरीच कमाई करते. एका पोस्टचे तिला 70 ते 80 लाख मिळतात. 6 / 8करिश्मा मुंबईतील पॉश एरियात 3 बीएचके फ्लॅटमध्ये राहते. इथे ती आपल्या कुटुंबासोबत राहते. तिने स्वत: घर डिझाईन केलं आहे. याशिवाय तिच्याकडे अनेक महागड्या गाड्याही आहेत.7 / 8करिश्माने 2022 साली वरुण बंगेरासोबत लग्नबंधनात अडकली. वरुण रिअल इस्टेट बिझनेसमन आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 8 / 8करिश्मा सध्या सिनेमा आणि ओटीटीवरच आपलं नशीब आजमावत आहे. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications