Join us  

मुंबईतील नवीन घरात 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरचं लेकीसोबत सुंदर फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 5:00 PM

1 / 7
आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधतीची भूमिका साकारलीय अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर. मधुराणीचं या मालिकेमुळे खूप फॅन फॉलोईंग वाढलंय
2 / 7
मधुराणीच्या आयुष्यात एक आनंदाची गोष्ट घडलीय. ती म्हणजे मधुराणीने मुंबईत स्वतःचं नवीन घर विकत घेतलंय
3 / 7
मधुराणीने नवीन घरात लेकीसोबत खास फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे. ह्याहून सुंदर काय असावे असं कॅप्शन देत मधुराणीने हे फोटोशूट केलंय
4 / 7
मधुराणीने लेकीच्या साथीने स्वप्नपूर्तीचा आनंद घेतलाय. मुंबईत विलेपार्ले पुर्व येथे मधुराणीने घर घेतलंय. नवीन घर घेतल्याने मधुराणीचा आनंद गगनात मावेनासा झालाय
5 / 7
मधुराणी प्रभुलकरने नवीन घरात केलेल्या फोटोशूटला चाहत्यांनी पसंती दर्शवलीय. मधुराणीने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर नवं घर घेतलंय
6 / 7
मधुराणी प्रभुलकर मुळची पुण्याची आहे. परंतु मुंबईत घर घेणं हे तिचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न होतं. अखेर मधुराणीने हे स्वप्न पूर्ण केलंय
7 / 7
स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मधुराणीने स्वप्नपूर्ती केल्याने तिचे चाहते अन् कलाकार दोघांनी तिचं अभिनंदन केलंय
टॅग्स :मधुराणी प्रभुलकरआई कुठे काय करते मालिकाविलेपार्ले