Join us  

ही शान कोणाची! अभिनेत्री श्रेया बुगडे 'लालबागचा राजा'च्या चरणी नतमस्तक, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 3:24 PM

1 / 7
सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. गणेशोत्सवाचं नाव घेतलं की सगळीकडे लालबागचा राजाच्या जयघोष पाहायला मिळतो
2 / 7
लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी सामान्य नागरीकांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच बाप्पाच्या दर्शनासाठी आतुर असतात. बाप्पाच्या भक्तीत तल्लीन असतात
3 / 7
मराठमोळी अभिनेत्री श्रेया बुगडेने सुद्धा वेळात वेळ काढून लाडक्या लालबागचा राजाचं दर्शन घेतलंय. श्रेयाने दर्शनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत
4 / 7
श्रेया बुगडेने लालबागचा राजाच्या चरणांवर डोकं ठेवत दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला आहे. श्रेयाने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत
5 / 7
श्रेया बुगडे गेल्या अनेक वर्षांपासून चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. सध्या श्रेया ड्रामा ज्यूनियर्स कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतेय
6 / 7
श्रेया बुगडेच्या घरीही बाप्पा विराजमान असतो. श्रेया आणि तिचा पती निखिल सेठ बाप्पाची आराधना करुन पूजा करतात
7 / 7
श्रेया बुगडेच्या चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून कधी हसवणार याची तिच्या चाहत्यांना आतुरता आहे. श्रेयाच्या विनोदी भूमिका चांगल्याच गाजल्या
टॅग्स :गणेशोत्सव 2024श्रेया बुगडेचला हवा येऊ द्यासेलिब्रिटी गणेशलालबागचा राजा