Join us
Daily Top 2Weekly Top 5

"कपडे काढून मंत्रोच्चार कर, रातोरात स्टार होशील", टीव्ही अभिनेत्रीने सांगितलेला धक्कादायक प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 12:04 IST

1 / 8
मनोरंजसृष्टीत कास्टिंग काऊच काही नवीन नाही. काही नशिबवान कलाकारांनाच त्याचा सामना करावा लागलेला नसेल. पण बऱ्याच संघर्ष करणाऱ्या फिल्म इंडस्ट्रीत येऊ इच्छिणाऱ्या कलाकारांनी अगदी लहान वयातही याचा सामना केलेला असतो.
2 / 8
काही वर्षांपूर्वी जेव्हा #MeTOO कॅम्पेन आलं तेव्हा अनेकांनी आपली आपबीती सांगितली होती. मॉडेल, अभिनेत्रींच्या तक्रारींमुळे अनेक मोठ्या स्टार्सचा पर्दाफाश झाला होता. त्यातच एका टीव्ही अभिनेत्रीनेही धक्कादायक प्रसंग सांगितला होता. ती अभिनेत्री आहे सोनल वेंगुर्लेकर (Sonal Vengurlekar).
3 / 8
सोनल टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'कुछ तो लोग कहेंगे' मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली. यानंतर 'शास्त्री सिस्टर्स' मालिकेत तिने देवयानी शास्त्री ही भूमिका साकारली. सोनललाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. मी टू मोहिमेवेळी तिने याचा खुलासा केला होता.
4 / 8
ती म्हणाली होती की, 'मी फक्त १९ वर्षांची होते आणि काम मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. एका कास्टिंग एजन्सीने माझी ओळख राजा बजाज यांच्याशी करुन दिली. त्यांनी मला ऑडिशनला बोलावलं पण मी नीट डायलॉग बोलू शकले नाही. माझा चेहरा चांगला आहे, पण मला प्रोफेशनबद्दल नीट माहिती पाहिजे म्हणून त्यांनी मला एका शूटमध्ये त्यांची मदत करण्यास सांगितलं.'
5 / 8
'यानंतर राजा यांनी मला कपडे बदलून फोटोसेशनसाठी तयार राहण्यास सांगितलं. त्यांच्या हातात एक क्रीम होतं आणि कपडे बदलण्याआधी त्यांनी मला क्रीम ब्रेस्टवर लावण्यास सांगितलं. मी घाबरले पण तो पुढे आला आणि त्याने बळजबरी क्रीम लावलं.'
6 / 8
इतकंच नाही तर राजाने मला तांत्रिक विद्या शिकवतो असं सांगितलं म्हणजे मी रातोरात स्टार होईल. माझ्यासमोर कपडे काढून बस आणि माझ्यामागे मंत्र म्हण असंही तो म्हणाला. मी त्याला तिथेच झिडकारलं आणि नकार दिला. यानंतर तो पुढे आला आणि बळजबरी माझे कपडे काढण्याचा प्रयत्न करायला लागला. मी घाबरुन तिथून पळून गेले. तेव्हा माझ्या कुटुंबातलं कोणीच माझ्याबरोबर नव्हतं.'
7 / 8
'तेव्हा मी कस्तुरबा पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली होती. पण त्याच्या पत्नी आणि मुलीने माझ्यावरच पैसे उकळल्याचा आरोप लावला. मी पैशांसाठी त्याला ब्लॅकमेल करायचे असा त्याच्या मुलीने माझ्यावर आरोप लावला.'
8 / 8
सोनल वेंगुर्लेकर 'कुंडली भाग्य' मालिकेतही झळकली. तिचे सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर १० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
टॅग्स :सोनल वेंगुर्लेकरटिव्ही कलाकारमीटूकास्टिंग काऊचटेलिव्हिजन