Join us

Aditi Sharma : "१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 12:50 PM

1 / 11
टीव्ही शो 'अपोलिना'मध्ये दिसणारी आदिती शर्मा आता एक लोकप्रिय चेहरा बनली आहे. ती आपल्या साधेपणाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहे. News18 Showsha शी संवाद साधताना, आदितीने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करताना येणाऱ्या समस्यांबद्दल मोकळेपणाने सांगितलं.
2 / 11
आदितीने सांगितलं की, 'सेटवरचं शेड्यूल खूप डिमांडिंग असतं. सुटी मिळत नाही. वर्क लाईफ बॅलेन्स करणं खूप अवघड होऊन बसतं. इतकंच नाही तर अनेक वेळा शिफ्ट ९ तासांवरून १०, ११ किंवा १२ तासांपर्यंत वाढवली जाते.'
3 / 11
'आम्ही तासनतास काम करतो. जेव्हा आम्ही घरी जातो तेव्हा आम्हाला कळतं की, आपलं कुटुंब आधीच झोपलेलं आहे. म्हणजेच घरी यायला आपल्याला इतका उशीर होतो की, आपण कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही.'
4 / 11
'घरी पोहोचल्यावर जेवायला वेळ उरला तर जेवते आणि झोपते. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पुन्हा तेच करत आहात जे तुम्ही आदल्या दिवशी केलं होतं. ही समस्या आहे. आम्हाला कोणतीही सुटी मिळत नाही.'
5 / 11
'कधीही सुटी मिळते. अनेक वेळा रात्री नऊ वाजता आपल्याला दुसऱ्या दिवशी सुटी असल्याचं कळतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या पुढच्या दिवसाचं कसं प्लॅनिंग करू शकता? हा टीव्हीचा एक ड्रॉबॅक आहे. हे बदलण्यासाठी आपण काय करू शकतो हे मला माहीत नाही.'
6 / 11
आदिती स्वतःसाठी पर्सनल वेळ काढते. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली - 'मी लवकर उठण्याचा प्रयत्न करते. मला वेळ हवा आहे. व्यायामासाठी तुम्हाला किमान एक तास हवा आहे.'
7 / 11
'एखाद्या दिवशी, जर मला वर्कआउट करावंसं वाटत नसेल, तर किमान मी इन्स्टाग्राम वापरू शकते, मला हा वेळ हवा आहे. मला माझा वेळ हवा आहे. मी प्रॉडक्शनला सांगितलं आहे की, मी १२ तास काम करण्यास तयार आहे, त्यापेक्षा जास्त नाही.'
8 / 11
'मी ओव्हरटाइम काम करू शकत नाही. मलाही माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. मी दिवसभर फक्त पात्र साकारू शकत नाही. मी आदिती आहे याची स्वत:लाच आठवण करून देणं गरजेचं आहे.'
9 / 11
आदितीने टीव्हीवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. 'ये जादू है जिन का', 'कलीरें' आणि 'अपोलिना: पनों की अच्छी उडान'मध्ये दिसली आहे. या मालिकेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
10 / 11
आदिती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत. ते तिच्या अदांवर फिदा होतात.
11 / 11
टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार