२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 5:08 PM1 / 10१५० हून अधिक मालिकांमध्ये दिसलेल्या या अभिनेत्रीने इंडस्ट्री सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री? 2 / 10१५७ हून अधिक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर नुपूर अलंकारने अचानक ग्लॅमर जगताला अलविदा केला. 3 / 10नुपूर २७ वर्षे इंडस्ट्रीचा एक भाग होती. आता अभिनेत्री सर्व काही सोडून साध्वी बनली आहे.4 / 10अभिनेत्रीने २०२२ मध्ये कलाविश्व सोडण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा तिने याबद्दल सांगितले तेव्हा लोकांचा यावर विश्वास बसला नाही. 5 / 10अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती आणि इंडस्ट्रीतून निवृत्ती घेतल्यानंतर ती आपला आध्यात्मिक प्रवास सुरू करणार आहे, असे सांगितले होते. 6 / 10नुपूरने २००२ मध्ये अलंकार श्रीवास्तवसोबत लग्न केले. घरच्यांच्या संमतीनेच तिने सिनेइंडस्ट्रीतून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.7 / 10नुपूर अलंकार घर आणि नवऱ्याला सोडून वेगवेगळ्या तीर्थस्थळी भेट देत असते. ती भक्तीत तल्लीन दिसते. 8 / 10पर्सनल लाइफबद्दल सांगायचं तर नुपूर पतीपासून विभक्त झाली आहे आणि ती लाइमलाइटपासून दूर साधे जीवन जगते आहे.9 / 10नुपूर अलंकार 'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो', 'भागे रे मन', 'घर का लक्ष्मी', 'रेट', 'ये प्यार ना होगा काम' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये दिसली आहे. 10 / 10अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावर दररोज व्हिडिओ शेअर करत असते. या व्हिडिओंमध्ये ती भगव्या रंगाच्या कपड्यात पाहायला मिळते आणि तिच्या कपाळावर चंदनाचा टिक्का असतो. तसेच तिच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ असते. आणखी वाचा Subscribe to Notifications