Join us  

साखरपुड्यानंतर झालं ब्रेन हॅमरेज, अभिनेत्री आधीचं सगळंच विसरली; २ वर्ष झेलला त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 6:10 PM

1 / 8
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री पौलोमी दास (Poulomi Das) सध्या चर्चेत आहे. बिग बॉस ओटीटी 3 मध्ये ती सध्या दिसत आहे. पौलोमी नुकताच इतर स्पर्धकांसोबत तिच्या आयुष्यातला भयानक किस्सा शेअर केला आहे.
2 / 8
पौलोमीने 'सुहानी सी एक लडकी','काया','दिल ही तो है','बारीश' सारख्या गाजलेल्या मालिका आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. प्रोफेशनल आयुष्य सुरळीत सुरु असताना अचानक खऱ्या आयुष्यात तिला ब्रेन हॅमरेजचा सामना करावा लागला होता.
3 / 8
नुकतंच बिग बॉसच्या घरात आयुष्यातला तो कठीण प्रसंग शेअर करताना ती म्हणाली, '2022 मध्ये माझी एंगेजमेंट झाली होती. साखरपुड्यानंतर मी इटलीहून परत आले आणि मला ब्रेन हॅमरेज झालं. नंतरचे तीन महिने काय काय घडलं मला काहीही आठवत नाही.'
4 / 8
'ब्रेन हॅमरेजच्या ठीक आधी नक्की काय काय झालं हेही मला लक्षात नाही. तेव्हा २ वर्ष मी गायब होते. मी माझ्या घरी गेले होते. पण मला त्या २ वर्षांबद्दलही काही आठवत नाही. मी पूर्ण ब्लँक आहे. याचा माझ्यावर मोठा परिणाम झाला.'
5 / 8
इतकंच नाही तर नंतर पौलोमीला प्रोफेशनल आयुष्यातही संघर्ष करावा लागला. तिला परत आल्यावर काम मिळेना. एका प्रोडक्शन हाऊसने तिला कास्ट केलं आणि रातोरात काढूनही टाकलं.
6 / 8
तू सावळी दिसतेस. या भूमिकेसाठी तू योग्य नाहीस असं कारण देत ती केवळ गोरी नसल्याने तिला रिप्लेस केलं. त्यांना नॉर्थ इंडियन लूक हवा होता आणि पौलोमी बंगाली कुटुंबातली आहे. पण मला रंगामुळे फरक पडत नाही असं ती म्हणाली.
7 / 8
पौलोमीने ब्रेकअपवरही भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, 'मी ५ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. गेल्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये आमचं ब्रेकअप झालं. मी आयुष्यातला खूप महत्वाचा व्यक्ती गमावला.' हे सांगताना तिला रडू कोसळलं.
8 / 8
पौलोमीने 2016 साली 'सुहानी सी एक लडकी' मधून अभिनयाला सुरुवात केली. नंतर ती 'अघोरी','कार्तिक पूर्णिमा जेहनाबाद' अशा शोजमध्ये दिसली. 2022-23 मध्ये आलेल्या 'नागिन 6' मधील निगेटिव्ह भूमिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली.
टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार