PICS : आत्ताच्या ‘बबड्या’बद्दल थोडं खास...! असा आहे अद्वैत दादरकरचा प्रेरणादायी प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 5:30 PM1 / 10हो, आज नव्या बबड्याचा वाढदिवस. अर्थात ‘अग्गंबाई सुनबाई’मधील बबड्या म्हणजेच अभिनेता व दिग्दर्शक अद्वैत दादरकर याचा वाढदिवस.2 / 10‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत सोहम अर्थात बबड्याची भूमिका आशुतोष पत्कीने साकारली होती. मात्र ‘अग्गंबाई सुनबाई’ याा मालिकेत ही भूमिका अद्वैतच्या वाट्याला आली आहे.3 / 10अद्वैतच मराठी नाट्यक्षेत्रात देखील खूप योगदान आहे. काही सिनेमांमध्येही त्याने भूमिका केल्या आहेत.4 / 10 मुंबईतील दादरमध्ये अद्वैतचा जन्म झाला. बालमोहन विद्यामंदीर या शाळेत त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले.5 / 10लहानपणापासूनच अभिनयक्षेत्रात रस होता. कॉलेजात गेल्यावर अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रातच करिअर करायचे हा त्याचा निर्णय पक्का झाला.6 / 10कॉलेजात असताना अनेक एकांकीका स्पर्धा गाजवत असतानाच त्याने अनेक नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन केले. शिक्षण संपले आणि त्याने या क्षेत्रात स्वत:ला झोकून दिले.7 / 10रंगभूमीवर त्याने अनेक नाटकांचे दिग्दर्शन काम केले. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेमधील सौमित्रच्या व्यक्तिरेखेमुळे महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला..8 / 10 अद्वैतची पत्नी भक्ती देसाई ही सुद्धा अभिनेत्री आहे. अनेक नाटकात आणि काही मालिकांमध्ये तिने काम केले आहे.9 / 10अद्वैत आणि भक्ती कॉलेज जीवनापासूनच एकमेकांना ओळखतात. कॉलेजात असताना अद्वैत नाटकाचे दिग्दर्शन करायचा तर भक्ती नाटकात काम करायची़ यादरम्यान त्यांची भेट झाली.10 / 10या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि पुढे त्यांनी लग्न केले. अद्वैत व भक्ती यांना एक मुलगी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications