'लागीरं झालं जी' ही मालिका दिवसेंदिवस रंजक होत चाललेलं कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. अज्या आणि शीतली सोबत मालिकेतील प्रत्येक पात्र रसिकांच्या मनात घर करून आहेत. अनेक अडचणींवर मात करून शीतल आणि अजिंक्य एकत्र आले. नुकताच अज्या आणि शीतलीचा विवाहसोहळा रसिकांनी पाहिला. आता हे दोघे महाबळेश्वर येथे त्यांचा हनिमून एन्जॉय करताना पाहायला मिळणार आहे. लग्न झाल्यापासून अज्या आणि शीतली यांना एकत्र असा वेळच घालवायला नाही मिळाला. नातेवाईक आणि घरच्या सदस्यांची उठबस करण्यातच शीतलीचा सर्व वेळ जातो त्यामुळे अज्याची मात्र चिडचिड होतेय.
समाधान मामा आणि जीजी त्या दोघांनी एकत्र वेळ घालवावा म्हणून त्यांना बाहेर फिरायला जायचा सल्ला देतात. सध्या मालिकेत अज्या आणि शीतली त्यांच्या हनिमूनसाठी महाबळेश्वरला गेल्याचे प्रेक्षक पाहत आहेत. महाबळेश्वरच्या गारव्यात अज्या आणि शीतली प्रेमाचे ४ क्षण घालवत आहेत.
या खास भागाचे चित्रीकरण करताना शीतल म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकर म्हणाली,"प्रेक्षकांना अज्या-शीतलीचं प्रेम आणि त्यांची अनोख्या लव्हस्टोरी मध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि आता ते दोघे एकत्र आले आहेत व सर्व अडचणींपासून दूर, काही प्रेमाचे क्षण अनुभवत आहेत त्यामुळे आमच्या इतकेच प्रेक्षक देखील खूप उत्सुक असणार आहेत." अज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण म्हणाला, "प्रेक्षक अजिंक्य आणि शीतलच्या लग्नासाठी खूपचं उत्सुक होते आणि आता ते एकत्र आले आहेत त्यामुळे त्यांना एकत्र बघताना देखील प्रेक्षकांना नक्कीच छान वाटत असणार आहेत.हनिमूनसाठी ते दोघे महाबळेश्वर सारख्या निसर्गरम्य ठिकाणी आले आहेत आणि त्यांचा क्वालिटी टाईम स्पेंड करताना पाहायला मिळत आहेत.
'लागिरं झालं जी'मध्ये मामी आणि जयडी यांची भूमिकाही महत्त्वाची होती. या दोघी आणि राहुल्या प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत होते. काही वेळा तर हे त्रिकूट अज्या-शीतलीपेक्षाही भाव खाऊन जात होतं. परंतु, मान मिळत असतानाही त्या तुलनेत मानधन मिळत नसल्यानं जयडी आणि मामी नाराज होत्या. त्यांनी ही नाराजी व्यक्तही केली होती. पण, त्याचा काही उपयोग न झाल्यानं या जोडीनं मालिकेला राम-राम ठोकला आहे. त्यांची जागा नव्या कलाकारांनी घेतली असली, तरी या मामींच्या अभिनयात ती मजा नसल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे.