Join us

४० वर्षांचा ठेवा! जरतारीच्या शालूमध्ये पाठकबाईंचा मराठमोळा साज; फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 3:54 PM

1 / 7
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या अक्षयाने तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
2 / 7
पाठकबाई ही भूमिका साकारुन प्रसिद्ध झालेली अक्षया सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत येत असते.
3 / 7
गेल्या काही दिवसांपासून अक्षया विविध कारणांसाठी चर्चेत येत आहे. यावेळी ती तिच्या मराठमोळ्या साजशृंगारामुळे चर्चेत येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
4 / 7
काही दिवसांपूर्वीच अक्षयाने तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला हजेरी लावली. यावेळी तिने मरुन रंगाचा जरीकाठ असलेला शालू नेसला होता.
5 / 7
या लग्नसोहळ्यामध्ये अक्षयाने ४० वर्ष जुनी साडी परिधान केली होती. मात्र, त्याची चमक आणि त्यावर केलेलं नक्षी काम पाहून ती साडी अगदी नवीकोरी असल्यासारखी भासत होती.
6 / 7
या साडीसब अक्षयाने मराठमोळा लूक केला होता. नाकात नथ, मोत्यांचा हार, खोपा असा साजशृंगार तिने केला होता. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहे.
7 / 7
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अक्षयाने तिच्या साखरपुड्यातील काही निवड फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.
टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीसेलिब्रिटीटेलिव्हिजन