नताशाच्या प्रेमात वेडा झाला होता 'हा' अभिनेता; ब्रेकअपनंतर झालेली वाईट अवस्था, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 16:52 IST
1 / 10नताशा स्टँकोविचने तिच्या करिअरची सुरुवात प्रसिद्ध ब्रँडमधून केली. तिने अनेक अल्बममध्येही काम केलं आहे. टीव्ही शोशिवाय नताशाने चित्रपटांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. पण नताशा तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या पर्सनल लाईफसाठी जास्त चर्चेत असते. 2 / 10नताशा स्टँकोविच आणि हार्दिक पांड्याने वेगळे होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांना विभक्त झाल्याची माहिती दिली होती. त्यांना अगस्त्य नावाचा एक मुलगा देखील आहे. 3 / 10हार्दिक पांड्याआधी लोकप्रिय टीव्ही अभिनेता अली गोनी हा देखील नताशा स्टँकोविचच्या प्रेमात वेडा झाला होता. नताशा २०१४ पासून अली गोनीला डेट करत होती. पण काही कारणास्तव हे नातं फार काळ टिकलं नाही. 4 / 10आपल्या नात्याला आणखी एक संधी देण्यासाठी नताशा आणि अलीने डान्स रिॲलिटी शो नच बलिए ९ मध्ये देखील सहभाग घेतला. एवढंच नाही तर अली गोनीने टीव्हीवर नताशावरील प्रेम व्यक्त केलं होतं.5 / 10नताशासोबतच्या ब्रेकअपनंतर अली गोनीने आपली अवस्था कशी झाली होती हे सांगितलं होतं. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्याने प्रत्येकाला हार्टब्रेकसारख्या वाईट गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि त्याचंही हृदय तुटलेलं आहे असं सांगितलं. 6 / 10कोणीही त्याचं दुःख समजू शकत नाही, कारण तो एक असा व्यक्ती आहे जो कायम हसत असतो आणि इतरांना ते अजिबात कळू देत नाही. तो त्याच्या आई-वडिलांपासून दूर आहे आणि तो कोणत्या स्थितीत आहे हे त्यांना कधीच कळू नये असंही सांगितलं. 7 / 10अलीने कदाचित ही त्याची चूक होती की तो नताशावर खूप जास्त प्रेम करत होता आणि जेव्हा तिने तिच्याशी ब्रेकअप झालं तेव्हा तो कोलमडून गेला. चुकीच्या मार्गावर जात होता असंही सांगितलं. याच दरम्यान अली गोनी भावूक झाला. 8 / 10याआधीही अलीने सांगितलं होतं की, त्याच्या मते दोघांमध्ये खूप फरक होता. दोघेही वेगवेगळे धर्म आणि संस्कृतींशी संबंधित होते. त्यामुळेच काही मुद्द्यांवरून दोघांमध्ये मतभेद होते आणि त्यामुळेच ते वेगळे झाले.9 / 10अली गोनी गेल्या अनेक वर्षांपासून टीव्ही अभिनेत्री जॅस्मिन भसीनला डेट करत आहे. चाहत्यांना या जोडीला एकत्र पाहायला आवडतं. अली आणि जॅस्मिन अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबत वेळ घालवतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात.10 / 10