Join us

'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेत आनंदी-सार्थकचा विवाहसोहळा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 3:13 PM

1 / 6
स्टार प्रवाहवरील मन धागा धागा जोडते नवा मालिकेतल्या सार्थक-आनंदीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.
2 / 6
सार्थकचं आनंदीवर जीवापाड प्रेम आहे. आपल्या प्रत्येक कृतीतून आनंदीवरचं प्रेम आणि तिच्याविषयी वाटणारा आदर तो व्यक्त करत असतो.
3 / 6
सार्थक सारखा समजून घेणारा आणि चांगल्या-वाईट प्रसंगांमध्ये खंबीरपणे पाठीशी उभा रहाणारा जोडीदार मिळाला तर आयुष्य सुखकर होतं याची अनुभूती ही मालिका पहाताना मिळते.
4 / 6
लवकरच संपूर्ण कुटुंबाच्या साक्षीने हे दोघं पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
5 / 6
सार्थक-आनंदीची हळद, मेहंदी, संगीत आणि लग्न हे सगळे विधी अगदी पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहेत.
6 / 6
आनंदी-सार्थकच्या परिवारासोबतच स्टार प्रवाहच्या कुटुंबातले सदस्यही या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित रहाणार आहेत.