अंकिता लोखंडे-विकी जैनचा 'जॉर्जिया'मध्ये रोमान्स, Photos शेअर करत दाखवली झलक By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 1:54 PM1 / 8टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय जोडी अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) सध्या त्यांच्या व्हॅकेशन फोटोंमुळे चर्चेत आहे. बिग बॉसनंतर ही जोडी घराघरात पोहोचली.2 / 8अंकिता आणि विकी काही महिन्यांपासून 'मास्टर शेफ' या शोमध्ये दिसत आहेत. यातही एकमेकांची चेष्टा करणं, प्रेम दाखवणं यातून दोघांनी प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मन जिंकून घेतलं. 3 / 8आपल्या लाडक्या सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्यात नक्की काय चालू आहे हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. सध्या अंकिता आणि विकी जॉर्जियामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.4 / 8अंकिताची फॅशन स्टाईल नेहमीच ऑन पॉइंट असते. पांढरा शर्ट, ब्लॅक मिनी स्कर्ट, सनग्लासेस आणि शूज असा अंकिताचा क्लासी लूक आहे. जॉर्जियाच्या टुरिस्ट स्पॉट्सवर तिने फोटोशूट केलंय.5 / 8तर विकीही फॅशन बाबतीत काही कमी नाही. अंकितासोबत ट्विनिंग करत त्याने व्हाईट टीशर्ट आणि ब्लॅक ट्राऊजर घातली आहे. दोघंही एकमेकांना सुरेख कॉम्प्लिमेंट करत आहेत.6 / 8जॉर्जियामध्ये बोटिंग करताना दोघांचा रोमँटिक अंदाजही दिसत आहे. ज्यामध्ये अंकिता विकीला मिठी मारत असून विकी तिच्या गालावर किस करत आहे. 7 / 8अंकिता दिवसेंदिवस तरुणच होत चालली आहे. तिचं वय कमी होत आहे अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तिच्या एकंदर स्टाईलने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं आहे.8 / 8अंकिताने या फोटोंसोबत खास कॅप्शनही लिहिलं आहे. 'तू + मी + पासपोर्ट = आणि काय हवं'. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनीही 'नजर ना लगे' म्हणत कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications