अनुपमाची जादू! रूपाली गांगुली बनली टीव्हीची सर्वाधिक महागडी अभिनेत्री By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2022 10:13 AM1 / 10टीव्हीच्या दुनियेत गेल्या दीड वर्षांपासून टीआरपी चार्टवर आपला दबदबा कायम ठेवणारी मालिका कोणती तर ‘अनुपमा’. या मालिकेने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. कथा दमदार आहेच पण मालिकेची स्टारकास्टही तितकीच दमदार आहे. 2 / 10अनुपमाची भूमिका साकारली आहे ती रूपाली गांगुली हिने. वनराजच्या रोलमध्ये आहे सुधांशू पांडे आणि काव्याचा निगेटीव्ह रोल साकारला आहे तो मदालसा शर्मा हिने. कहाणीच्या अनुषंगाने एक एक पात्र अगदी विचारपूर्वक निवडलं आहे.3 / 10अनुपमा या मालिकेचा आत्मा आहे. ही भूमिका रूपालीने अगदी बेमालुमपणे साकारली आहे. कदाचित हेच कारण आहे की रूपाली गांगुली आजघडीला टीव्हीची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे.4 / 10मीडिया रिपोर्टनुसार, आधी रूपालीला प्रति एपिसोड दीड लाख मानधन दिलं जातं होतं. रोजच्या हिशेबाने ही रक्कम मोठी होती. पण आता ही मानधनाची रक्कम दुप्पट झाली आहे.5 / 10होय, बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, आधी रूपालीला प्रति एपिसोड दीड लाख मानधन मिळायचं. आता ती प्रति एपिसोड तीन लाख रूपये मानधन घेतेय आणि याच कारणामुळे ती टीव्हीची महागडी अभिनेत्री बनली आहे.6 / 10फीच्या बाबतीत रूपालीने टीव्हीच्या अनेक लोकप्रिय चेहºयांना मागे टाकलं आहे. रूपालीला आता राम कपूर व रोनित रॉय बोस यांच्यापेक्षाही अधिक मानधन दिलं जात आहे.7 / 10रूपालीला तुम्ही याआधी साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेत पाहिलं असेल. बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्येही ती सहभागी झाली होती.8 / 10पहिल्या चार वर्षात रुपाली गांगुलीने पाच मालिकांमध्ये काम केले. मात्र यापैकी एकही मालिका सहा महिने देखील चालली नाही. दरम्यान साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेत काम करण्याची संधी तिला मिळाली आणि तिच्या करियरला कलाटणी मिळाली.9 / 10रुपाली गांगुलीने २००० साली सुकन्या या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर तिने दिल है की मानता नही, जिंदगी तेरी मेरी कहानी, भाभी, काव्यांजली या मालिकांमध्ये काम केले.10 / 10मात्र यातील एकही मालिका फारशी कमाल दाखवू शकली नाही. त्यामुळे रुपालीवर फ्लॉप अभिनेत्रीचा टॅग लागला गेला. तिला कामही मिळणे बंद झाले होते. त्याच काळात तिने संजीवनी या मालिकेत काम केले. ही मालिका सुपरहिट ठरली पण यात रुपाली सहाय्यक भूमिकेत होती. आणखी वाचा Subscribe to Notifications