Join us  

एकेकाळी ५० रुपयांसाठी तब्बल १५ किमी चालायची; आज एका एपिसोडसाठी घेते लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2024 4:17 PM

1 / 8
टीव्ही जगतात अधिराज्य गाजवणारी प्रतिभावान अभिनेत्री म्हणजे रुपाली गांगुली. सध्या रुपाली छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो 'अनुपमा'मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे.
2 / 8
रुपालीचे असंख्य चाहते आहेत. या अनुपमा शोने तिला पुन्हा एकदा स्टार बनवलं आहे. या शोच्या माध्यमातून रुपाली भरपूर कमाईही करत आहे. तसेच ती लोकप्रियही झाली आहे.
3 / 8
रिपोर्ट्सनुसार, रुपाली गांगुली आता एका एपिसोडसाठी तीन लाख रुपये इतकी मोठी फी घेते. अशा परिस्थितीत रुपालीच्या आयुष्यात अशी वेळ आली होती हे जाणून तुम्हाला धक्का बसेल.
4 / 8
जेव्हा अभिनेत्रीचं कुटुंब आर्थिक संकटातून जात होतं, तेव्हा ती ५० रुपये कमवण्यासाठी १५ किमी चालत असे. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
5 / 8
अभिनेत्रीने सांगितलं होतं की, जेव्हा ती तिच्या करिअरला सुरुवात करत होती तेव्हा तिला एक नाटक मिळालं होतं. ज्यासाठी त्याला ५० रुपये मिळाले.
6 / 8
त्यावेळी त्या नाटकासाठी वरळी ते पृथ्वी थिएटर जुहूपर्यंत चालत जात असे, असं अभिनेत्रीने सांगितलं होतं. जेणेकरून पैसे वाचू शकतील. तिथे गेल्यावर नाटकाचे पन्नास रुपये तर कधी समोसाही मिळत असे.
7 / 8
आज रुपाली गांगुली टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. तिचा शो ‘अनुपमा’ टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर येतो.
8 / 8
टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार