Join us  

Arti Singh : डिप्रेशन आलं, अनेक महिने बेरोजगार, मिळालं नाही काम; गोविंदाच्या भाचीने मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 11:28 AM

1 / 10
गोविंदाची भाची आणि कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंहने एप्रिलमध्ये बिझनेसमन दीपक चौहानशी लग्न केलं आहे. लग्नानंतर ती तिच्या पतीसोबत खूप आनंदात आहे.
2 / 10
आरतीने तिच्या प्रोफेशनल लाईफमध्ये अनेक चढउतार पाहिले आहेत. तिला इंडस्ट्रीत फारसं काम मिळत नाही असं आरतीने म्हटलं आहे.
3 / 10
अभिनेता आणि बिग बॉस 13 फेम पारस छाबराच्या पॉडकास्टमध्ये आरती सिंह म्हणाली की, 'बिग बॉस 13 नंतर मला इतर स्पर्धकांना जेवढं काम मिळत होतं तेवढं काम मिळत नव्हतं.'
4 / 10
'इतर लोक अनेक म्यूझिक व्हिडीओ करत होते. त्यांना शोही मिळत होते.' पारसने आरतीला विचारले- बिग बॉसनंतर तिला मेंटल डिप्रेशनने ग्रासलं होतं का? त्यावर उत्तर देताना आरतीने हो असं म्हटलं आहे.
5 / 10
अभिनेत्री म्हणाली की, रिॲलिटी शो संपल्यानंतर काम शोधण्यासाठी धडपड करत होती, त्यामुळे तिच्या मेंटल हेल्थवर अत्यंत वाईट परिणाम झाला होता.
6 / 10
शोनंतर इतर स्पर्धकांना टीव्ही शो, चित्रपट, म्युझिक व्हिडीओज मिळत असताना, ती मात्र बरेच महिने काहीही काम न करता राहिली होती.
7 / 10
आरतीसाठी तो काळ खूपच आव्हानात्मक होता. पारसने असंही सांगितलं की, शोनंतर त्यालाही काम शोधण्यात खूप अडचण आली.
8 / 10
आरती सिंहने मायका, उतरन, ससुराल सिमर का सारखे शो केले आहेत.
9 / 10
आरती सिंह सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत.
10 / 10
टॅग्स :आरती सिंगटेलिव्हिजन