ऋत्विक धनजानीशी ब्रेकअपनंतर 'या' हँडसम अभिनेत्याला डेट करतेय आशा नेगी? Photos व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 3:36 PM1 / 8टीव्हीवरचं सर्वात रोमँटिक कपल म्हणून आशा नेगी (Asha Negi) आणि ऋत्विक धनजानी (Rithvik Dhanjani) यांचं नाव घेतलं जायचं. 7 वर्ष दोघंही रिलेशनशिपमध्ये होते. २०२० साली त्यांचा ब्रेकअप झाला.2 / 8ऋत्विक आणि आशाच्या ब्रेकअपचा सर्वात मोठा धक्का चाहत्यांना बसला. 'आश्विक' नावाने त्यांचे अनेक फॅन पेजेस आहेत. आजही या फॅन पेजेसवर त्यांच्याच पोस्ट असतात.3 / 8आता आशा एका अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा आहे. हा अभिनेता ऋत्विकचाच मित्रही आहे. आशाचे या हँडसम हंकबरोबरचे काही फोटो आता व्हायरल होत आहेत.4 / 8हा अभिनेता आहे आर्यमन सेठ (Aaryaman Seth). अभिनेत्री कीश्वर मर्चंटने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केलेत. यामध्ये आशा आणि आर्यमन एकमेकांचा हात हात घेऊन बसले आहेत.5 / 8शिवाय एका फोटोत आशाने कीश्वरच्या मुलाला कडेवर घेतलं आहे. आणि बाजूला आर्यमन तिच्या खांद्यावर हात ठेवून उभा आहे. 6 / 8सोशल मीडियावर आर्यमन आणि आशाचे अनेक फोटो आहेत. दोघंही एकमेकांचे आधीपासून मित्रही आहेत. तसंच ऋत्विकचाही तो चांगला मित्र आहे.7 / 8गणेशोत्सव सणाच्या वेळी आर्यमनने आशासोबत पारंपरिक लूकमधील काही फोटो पोस्ट केले होते. तेव्हाही त्यांच्या नात्याची चर्चा झाली होती. 8 / 8आर्यमन सेठने अनेक मालिकांमध्ये दिसला आहे. 'महाभारत','बधाई हो बेटी हुई है' ,'बकुळा बुआ का भूत','देवो के देव महादेव' या मालिकांमध्ये तो झळकला आहे. 'तनाव' या वेबसीरिजमध्येही त्याने काम केलं. आणखी वाचा Subscribe to Notifications