Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 3:06 PM1 / 10'भाबीजी घर पर हैं' या लोकप्रिय टीव्ही शोमधून अभिनेत्री सौम्या टंडनला घराघरात ओळख मिळाली आहे. सौम्या या शोमध्ये गोरी मॅमच्या भूमिकेत दिसली होती.2 / 10सौम्याची ही भूमिका चाहत्यांना इतकी आवडली की शो सोडल्यानंतरही लोक तिला गोरी मॅम या नावानेच ओळखतात. तिची ही भूमिका सर्वांच्याच विशेष लक्षात राहिली आहे. 3 / 10अभिनेत्री सौम्या टंडन सध्या त्रासात आहे. ती आजारी असून प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.4 / 10सौम्याने स्वत:च याबाबत माहिती दिली आहे. हॉस्पिटलच्या बेडवरचे काही फोटो शेअर केले आहेत. सौम्याच्या हातावर ड्रिप असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.5 / 10अभिनेत्रीने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर याबाबत पोस्ट शेअर केली आहे. 'फोटो नेहमीच सुंदर नसतात आणि आयुष्य नेहमीच हसत नसतं' असं तिने म्हटलं आहे.6 / 10'माझी प्रकृती सुधारत आहे आणि लवकरच मी फिट होऊन परत येईन. तुम्ही सर्वांनी केलेल्या प्रार्थनेबद्दल धन्यवाद' असंही सौम्याने म्हटलं आहे. 7 / 10सौम्या टंडनला नेमकं काय झालं हे अद्याप माहीत नाही, परंतु अभिनेत्रीच्या या पोस्टमुळे चाहत्यांना तिची खूप काळजी वाटत आहे. ते चिंतेत आहेत. 8 / 10सौम्या टंडनने टीव्ही शोशिवाय चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तिने 'जब वी मेट' आणि 'वेलकम टू पंजाब' मध्ये काम केलं आहे. ती सोशल मीडियावर एक्टिव्ह असून नेहमीच फोटो शेअर करत असते. 9 / 1010 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications