'या' कारणामुळे भाऊ कदम आहे डाऊन टू अर्थ; स्वत: केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 18:49 IST
1 / 9'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे भाऊ कदम.2 / 9उत्तम विनोदशैली आणि दमदार अभिनयकौशल्य यांच्या जोरावर भाऊने प्रेक्षकांना कमी काळात आपलंसं केलं.3 / 9भाऊ कदम यांनी चला हवा येऊ द्यासोबतच काही सिनेमांमध्येही काम केलं आहे.4 / 9आज भाऊकडे यश, संपत्ती, प्रसिद्धी सारं काही आहे. मात्र, तरीदेखील त्याचे पाय अद्यापही जमिनीवर आहेत.5 / 9अलिकडेच भाऊने तो अद्यापही डाऊन टू अर्थ कसा काय आहे या मागचं कारण सांगितलं.6 / 9अलिकडेच भाऊचा ५० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्याचे घरातले त्यांच्याविषयी भरभरुन बोलले. 7 / 9घरातल्यांचं बोलणं ऐकून भाऊ भारावून गेला. आणि, भावुक होऊन त्याने त्याच्या डाऊन टू अर्थ असण्यामागचं कारण सांगितलं.8 / 9'मागापासून सगळे मला डाऊन टू अर्थ आहे असं म्हणत आहेत. असं असण्यामागे एक कारण. ट्रॉफी घेऊन मी घराच्या दारात येतो. घराची बेल वाजवतो. बायको दार उघडते. मला असं वाटतं की आता सगळे येतील.सगळ्यांना आश्चर्य वाटेल ट्रॉफी बघून. पण ट्रॉफी बाजूला ठेवतात. माझ्या हातात पिशवी देतात आणि जा दूध घेऊन या असं सांगतात. मग मला सांगा मी का नसेल डाऊन टू अर्थ. का मी हवेत उडेन? त्यामुळे असा मी तो डाऊन टू अर्थ आहे', असं भाऊ कदम म्हणाले.9 / 9भाऊ कदमने नशीबवान, पांडू, टाइमपास,सायकल अशा कितीतरी सिनेमात काम केलं आहे.