1 / 9‘बिग बॉस 14’ फेम राहुल वैद्य आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री दिशा परमार यांच्या लग्नाची तारीख अखेर ठरली.2 / 9 राहुलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. 3 / 9राहुलनं बिग बॉसच्या घरात अगदी जाहीरपणे दिशावरचे प्रेम व्यक्त केले होते. शिवाय याच घरात दिशाला लग्नासाठी प्रपोजही केले होते. तेव्हापासून या कपलच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता होती.4 / 9तर राहुल व दिशा येत्या 16 जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. ‘आम्ही 16 जुलै 2021 रोजी लग्नगाठ बांधणार आहोत. आपल्या सर्वांचे प्रेम आणि शुभेच्छा आवश्यक आहेत. आम्ही एकत्र एक नवीन अध्याय सुरू करणार आहोत,’ अशी पोस्ट राहुलने शेअर केली आहे.5 / 9 राहुल वैद्यनं दिशा परमारला ‘बिग बॉस 14’च्या घरात, नॅशनल टेलिव्हिजनवर प्रपोज केले होते. यानंतर दिशा परमार त्याला भेटायला आली होती आणि याचवेळी तिनं राहुलचा प्रस्ताव देखील मान्य केला होता. 6 / 9राहुलची होणारी पत्नी दिशा ही सुद्धा टीव्ही इंडस्ट्रीचा एक लोकप्रिय चेहरा आहे. आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत असते. ‘प्यार का दर्द’ या टीव्ही शोमध्ये दिशाने काम केले आहे.7 / 9 दिशा व राहुलची पहिली भेट ‘याद तेरी’या म्युझिक व्हिडीओच्या निमित्ताने झाली होती. या व्हिडीओनंतर दोघांच्या डेटींगच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दिशा टीव्ही सीरियल ‘तू अपना सा’मध्ये दिसली होती. 8 / 9‘बिग बॉस 14’नंतर राहुल वैद्य ‘खतरों के खिलाडी 11’साठी केपटाऊनला रवाना झाला होता. त्याला एअरपोर्टवर सोडायला आलेली दिशा कमालीची भावुक झाली होती. अर्ध्या रात्री राहुलला विमानतळावर सोडण्यासाठी आलेली दिशा प्रियकराला सोडायला तयार नव्हती आणि राहुल कसाबसा तिला समजावत होता.9 / 9विमानतळावर एकमेकांना निरोप देताना राहुल व दिशाची झालेली अवस्था निव्वळ ड्रामा असल्याचे म्हणत, अनेकांनी सोशल मीडियावर या कपलला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता.