bigg boss 15 : सिम्बा नागपालला लहानपणी वडिल काठीनं बदडायचे... By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 1:37 PM1 / 8‘बिग बॉस 15’ची सध्या जोरदार चर्चा आहे. प्रत्येकजण करण कुंद्रा, जय भानुशाली, तेजस्वी प्रकाश, प्रतीक सेहजपाल यांच्याबद्दल बोलताना दिसत आहेत. यादरम्यान बिग बॉसच्या घरातील एक स्पर्धक अगदी समजूतदारीने गेम खेळताना दिसतोय. त्याचं नाव सिम्बा नागपाल. 2 / 8होय, फार कुणाच्या भांडणात न पडणारा आणि संधी मिळताच आपली बाजू मांडणारा सिम्बा बिग बॉसच्या घरात रमला आहे. याच सिम्बाच्या पर्सनल लाईफबद्दल कदाचित तुम्हाला ठाऊक नसावं.3 / 8सिम्बा नागपालने 2018 साली एमटीव्ही स्प्लिटविला 11 मध्ये भाग घेतला होता. या शोदरम्यान संयुक्ता हेगडे व मोनल जागतानीसोबत त्याचं नावं जोडलं गेलं होतं. पण सिम्बाने या दोघीही आपल्या चांगल्या मैत्रिणी असल्याचं म्हटलं होतं.4 / 8रोडीज् दरम्यान सिम्बाने त्याच्या पर्सनल लाईफबद्दल मोठा खुलासा केला होता. तो म्हणाला होता की, मी इंटोवर्ट व्यक्ति आहे. माझे वडील आई आणि माझ्यासोबत खूप वाईट वागतं. लहानपणी वडील मला काठीने मारायचे. वडिलांच्या याच वागणुकीने मला आतून स्ट्राँग बनवलं. कदाचित त्याचमुळे मी नॅशनल लेव्हलचा बॉक्सर बनलो.5 / 8सिम्बा 12 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. पहिल्या दिवशी तो वडिलांसोबत खेळला होता आणि दुसºया दिवशी पापा कुठं आहेत, असं आईला विचारल्यावर ते न्यूयॉर्कला गेले आहेत, असं उत्तर त्याच्या आईने दिलं होतं. काही वर्षानंतर वडिलांचा एका अपघातात मृत्यू झाल्याचं सिम्बाला कळलं होतं.6 / 82020 मध्ये सिम्बाने रूबीना दिलैकसोबत ‘शक्ती’ या मालिकेद्वारे टीव्हीवर पदार्पण केलं होतं.7 / 8सिम्बा केवळ 22 वर्षांचा आहे. इतक्या कमी वयात त्याला बिग बॉसमध्ये संधी मिळाली आहे. मी आईसाठी या शोमध्ये आलो आहे. तिच्यासाठी मी हा शो करतोय, असं सिम्बा म्हणाला होता.8 / 8सिम्बाचा बिग बॉसच्या घरातील खेळ पाहून सलमानही प्रभावित झाला होता. सिम्बा तू खूप चांगला गेम खेळतोय, अशा शब्दांत सलमानने सिम्बाचं कौतुक केलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications