Join us  

Ayesha Khan : "२ मुलांनी निर्जन रस्त्यावर..."; अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, झाली होती अत्यंत वाईट अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 3:51 PM

1 / 10
'बिग बॉस १७' मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आलेली अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेन्सेशन आयशा खान लोकप्रिय आहे. या शोपासून आयशाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.
2 / 10
आयशा 'बिग बॉस १७' मध्ये प्रकाशझोतात आली जेव्हा तिने मुनव्वर फारुकीवर एकाच वेळी दोन मुलींना डेट केल्याचा आरोप केला. आयशाने दावा केला होता की, तिचं आणि मुनव्वरचं रिलेशन होतं. मात्र शोमध्ये नंतर दोघांमध्ये सर्वकाही नॉर्मल झालं.
3 / 10
आयशा सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. तिचे असंख्य चाहते आहेत. आयशा खानने तिच्यासोबत घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेचा खुलासा केला आहे.
4 / 10
व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने सांगितलं की, हैदराबादमध्ये तिच्यासोबत एक भयंकर घटना घडली आहे. हॉटेलबाहेर दोन अज्ञात व्यक्तींनी आयशासोबत गैरवर्तन केलं.
5 / 10
तिने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, दोन अनोळखी मुलं तिच्या मित्राचं नाव घेऊन तिला भेटले आणि नंतर एका निर्जन रस्त्यावर तिच्याशी हात मिळवण्याचा प्रयत्न करत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
6 / 10
व्हिडिओमध्ये भावुक होऊन आयशाने सांगितलं की, हैदराबादमधील हॉटेलबाहेर दोन मुलं तिला भेटायला आली, त्यांनी सकाळपासून अभिनेत्रीची वाट पाहत असल्याचं सांगितलं. यानंतर दोन्ही मुलांनी आयशासोबत ज्या पद्धतीने हस्तांदोलन केलं ते अभिनेत्रीलाही विचित्र वाटलं.
7 / 10
दोघांनी जबरदस्तीने फोटो क्लिक केला आणि आयशाचा पर्सनल नंबरही मागायला सुरुवात केली. मात्र, तिने माझ्या मॅनेजरशी बोला, असं सांगताच दोन्ही मुलांनी निर्जन रस्त्यावर आयशासोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.
8 / 10
आयशा खान मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने 'मुखचित्रम' या तेलुगू चित्रपटातून पदार्पण केलं आहे. चित्रपटांव्यतिरिक्त आयशा अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे. यामध्ये मोहब्बत के काबिल, गिटार, रिबॉर्न इत्यादींचा समावेश आहे.
9 / 10
अभिनेत्री असण्यासोबतच, आयशा एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर देखील आहे जिची इन्स्टाग्रामवर खूप मोठी फॅन फॉलोअर आहे. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीला पाच मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.
10 / 10
टॅग्स :बिग बॉस