'बिग बॉस'च्या घरातील 'ही' अभिनेत्री आहे प्रियांका चोप्राची बहीण, जाणून घ्या त्यांच्यामधील नेमकं नातं By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 5:51 PM1 / 8'बिग बॉस हिंदी'च्या नव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. लखलखत्या दुनियेतील अनेक सेलिब्रिटींनी 'बिग बॉस १७'च्या घरात एन्ट्री घेतली. पण, या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते अभिनेत्री मनारा चोप्रा हिने. 2 / 8'बिग बॉस १७'च्या घरात एन्ट्री करण्याचा पहिला मान मनाराला मिळाला. मनाराने मोठ्या दिमाखात 'बिग बॉस'च्या घरात पाऊल ठेवलं. पहिल्या दिवसापासूनच मनारा 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. 3 / 8मनाराच्या आडनावामुळे ती प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची नातेवाईक आहे का? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. याचा खुलासा मनाराने पहिल्याच दिवशी 'बिग बॉस'च्या घरात केला. 4 / 8प्रियांका चोप्राची बहीण असल्याचं मनाराने सांगितलं होतं. पण, त्यांच्यातील नेमकं नातं मात्र ठाऊक नव्हतं. त्यामुळे प्रियांका आणि मनारामध्ये नेमकं काय नातं आहे? याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. 5 / 8'बिग बॉस'च्या घरात याबाबत कॉमेडियन मुनव्वर फारुकीने मनाराला विचारलं होतं. तेव्हा मनाराला थोडा राग आल्याचं तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. मुनव्वर फारुकीशी बोलताना मनाराने प्रियांकाबरोबर असलेल्या तिच्या नात्याबद्दल भाष्य केलं होतं. 6 / 8मनारा ही प्रियांका चोप्राच्या मामाची मुलगी आहे. नुकतंच प्रियांकाने बहिणीला पाठिंबा देण्यासाठी खास पोस्ट शेअर केली होती. प्रियांकाने मनाराबरोबरचा फोटो शेअर करत तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली होती. 7 / 8मनारा ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने तेलुगु, तमिळ, कन्नडबरोबरच हिंदी चित्रपटांतही काम केलं आहे. भर कार्यक्रमात दिग्दर्शकाने गालावर किस केल्यामुळे मनारा चोप्रा चर्चेत आली होती. 8 / 8मनाराला पहिल्याच आठवड्यात 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांनी नॉमिनेट केलं आहे. त्यामुळे की 'बिग बॉस'च्या घरात पहिलं पाऊल टाकणारी मनारा घरातून बाहेर पडणारी पहिली सदस्य ठरणार का? हे पाहावं लागेल. आणखी वाचा Subscribe to Notifications