Join us  

"एक दिवस सगळं संपलं, शूटिंगवरुन घरी येते तेव्हा..."; अभिनेत्रीने आधी वडील गमावले मग आई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 11:47 AM

1 / 10
टीव्ही अभिनेत्री एलिस कौशिक अत्यंत वेदनादायी अनुभवातून गेली आहे. एलिस तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. पण त्यांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये एलिसच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा ती खूप लहान होती.
2 / 10
आता एलिसने बिग बॉसच्या घरात दमदार एन्ट्री केली आहे. या शोमधील पहिल्याच भेटीत सलमान खान तिच्यावर खूप इम्प्रेस झाल्याचं पाहायला मिळालं.
3 / 10
एलिसने तिच्या इंट्रो व्हिडीओमध्ये सांगितलं की, ती तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. बिग बॉस १८ च्या एंट्रीच्या वेळी ती खूप उत्साही दिसत होती, परंतु इंट्रो व्हिडिओ सुरू होताच ती खूप भावूक झाली.
4 / 10
व्हिडिओमध्ये ती म्हणाली, 'माझे वडील माझी शक्ती होते. पण एक दिवस सगळं संपलं. माझ्या आयुष्यात शांतता पसरली होती. माझी आई माझ्यासाठी होती. पण तिने काही वर्षांनी दुसरं लग्नही केलं.'
5 / 10
'गरजेच्या वेळी आई नेहमी माझ्यासोबत होती. पण अचानक आईही निघून गेली, माझ्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे. जेव्हा मी शूटिंगवरून घरी येते, तेव्हा ते रिकामेपण मला त्रास देतं.'
6 / 10
'बिग बॉसच्या घरात आता मी एकटीच जात आहे, पण कुटुंब मिळवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, मी जेव्हाही बाहेर येईन तेव्हा एका कुटुंबासोबत बाहेर येऊन.'
7 / 10
व्हिडिओ पाहिल्यानंतर सलमान खानने एलिसला काही प्रश्न विचारले. यानंतर सलमान म्हणाला की, एलिस तू शो जिंकण्याची १०० टक्के शक्यता आहे. सलमानने स्टेजवर नर्व्हस होत असलेल्या एलिसला प्रेरित करण्याचा प्रयत्न केला.
8 / 10
एलिस कौशिक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. पांड्या स्टोअरमध्ये तिने चांगली भूमिका साकारली आहे. दिल्लीत जन्मलेली एलिस या शोमध्ये रावीच्या भूमिकेत दिसली होती.
9 / 10
अभिनेत्री एलिस कौशिक सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे जबरदस्त, ग्लॅमरस फोटो शेअर करते. तिचे असंख्य चाहते आहे. बिग बॉसच्या घरात ती आता कशी धमाल करणार याची उत्सुकता आता प्रेक्षकांना आहे.
10 / 10
टॅग्स :टेलिव्हिजन