कोरीव शिल्पे, मोठ्या घंटा अन् प्राचीन बांधकाम! 'बिग बॉस १८'चं घर पाहून तुम्हालाही होईल टाइम ट्रॅव्हल By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 3:16 PM1 / 9Bigg Boss 18 : 'बिग बॉस' हिंदीचं नव पर्व उद्यापासून सुरू होत आहे. बिग बॉस १८ ची यंदाची थीम टाइम ट्रॅव्हलवर आधारित आहे. 2 / 9यंदा बिग बॉसचं घरही त्याच पद्धतीने डेकोरेट करण्यात आलं आहे. या फोटोंमधून घराची झलक पाहायला मिळत आहे. 3 / 9गार्डन एरियामध्ये स्विमिंगपूललाही खास टच देण्यात आल्याचं दिसत आहे. स्विमिंगपूलच्या एका बाजूला माणसाचा चेहरा कोरण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला मातीचं सुबक काम करण्यात आलं आहे. 4 / 9बिग बॉसच्या घरातील लिव्हिंग एरियामध्येही खास नक्षीकाम करण्यात आलं आहे. 5 / 9एखाद्या गुहेत किंवा लेणीमध्ये आल्याचा फील बिग बॉसच्या घरात पाहायला मिळत आहे. 6 / 9बेडरुममध्ये अशाच प्रकारे डेकोरेट करण्यात आलं आहे. स्पर्धकांसाठी प्रशस्त बेड असल्याचंही दिसत आहे. 7 / 9यंदा बिग बॉसच्या घरातील जेलही खास असणार आहे. हे जेल एखाद्या गुहेसारखं तयार करण्यात आलं आहे. 8 / 9घरातील किचन एखाद्या लेणीसारखं भासत आहे. खास टच किचनला देण्यात आला आहे. 9 / 9बिग बॉस १८ मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications