'बिग बॉस'चं घर डोक्यावर घेणारे गुणरत्न सदावर्ते कोण आहेत? वडील पोलीस तर डॉक्टर बायकोही आहे अवलिया By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 2:34 PM1 / 9Bigg Boss 18 : बिग बॉस हिंदीचं नवं पर्व नुकतंच सुरू झालं आहे. यंदाच्या पर्वात वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते सहभागी झाले आहेत. 2 / 9सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पहिल्या दिवसापासूनच सदावर्तेंनी घरात त्यांचा दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.3 / 9बिग बॉसचं घर डोक्यावर घेणारे गुणरत्न सदावर्ते कोण आहेत? याबद्दल जाणून घेऊया. सदावर्ते हे एक प्रसिद्ध वकील आहेत. वादग्रस्त विधानांमुळे ते कायमच चर्चेत असतात. 4 / 9सदावर्ते वकील असण्याबरोबरच डॉक्टरही आहेत. त्यांनी पीएचडी पर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे. 5 / 9गुणरत्न सदावर्ते यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही कायम चर्चेत असते. जयश्री सदावर्ते यादेखील एक डॉक्टर आहेत. सदावर्ते कपलचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. 6 / 9सदावर्ते यांची मुलगी जेन हिने अवघ्या १० वर्षांच्या वयात १७ लोकांचे प्राण वाचवले होते. २०१८ मध्ये क्रिस्टल प्लाजा येथे आग लागली होती. 7 / 9त्यावेळी तिसरीत असणाऱ्या जेनने लोकांना सुखरुप बाहेर काढलं होतं. यासाठी तिला राष्ट्रीय वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 8 / 9सदावर्ते यांचे वडीलही पोलीस विभागात कार्यरत होते. राजकारणातही त्यांचा सहभाग होता. 9 / 9चुकीच्या वर्तणुकीमुळे सदावर्तेंचं लायसन्स स्टेट बार काऊन्सिलकडून दोन वर्षांसाठी रद्दही करण्यात आलं होतं. अनेकदा ते जेलमध्येही गेले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications