Nikki Tamboli : "मी आतून मरत होते", Bigg Boss फेम अभिनेत्री 2 वर्षांपासून होती डिप्रेशनमध्ये, आता मांडली व्यथा By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 5:10 PM1 / 7'बिग बॉस 14' मध्ये अभिनेत्री निक्की तांबोळीने एक जबरदस्त पर्सनॅलिटी म्हणून छाप पाडली. निक्कीने कोणत्याही विषयावर आपले मत उघडपणे व्यक्त करून चाहत्यांची मने जिंकली. मात्र, 'बिग बॉस'मधून बाहेर पडल्यानंतर तिच्या निक्की तांबोळीसोबत असं काही घडलं, ज्यानंतर ती खूप तणावाखाली राहू लागली. 2 / 7अभिनेत्रीने आता याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. Bigg Boss फेम अभिनेत्री 2 वर्षांपासून डिप्रेशनमध्ये होती. 'मी आतून मरत होते' असं म्हणत तिने आपली व्यथा मांडली आहे. निक्की तांबोळीने 4 मे 2021 रोजी तिचा भाऊ जतीन तांबोळी गमावला आहे. कोरोना व्हायरसमुळे जतीनचा मृत्यू झाला आहे. 3 / 7कोरोनामुळे भावाचं निधन झाल्यानंतर निक्की तांबोळी आतून तुटली होती. ती अजून देखील स्वत:ला यातून सावरू शकलेली नाही. Koimoi च्या एका रिपोर्टनुसार, निक्की म्हणाली, 'बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर मला अनेक ऑफर आल्या, पण मी योग्य निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.'4 / 7'आपलं माणूस गमावल्याच्या दुःखाशी झुंज देताना, ही मागची दोन वर्षे खूप कठीण गेली आहेत. मी हरवली होती आणि माझ्या भावाची आठवण करून सकारात्मक राहणे कठीण होतं. हजारो लोकांमध्ये हसायची, पण आतून मरत होती.'5 / 7निक्की तांबोळी पुढे म्हणाली, 'वेळ निघून जाते, पण तिने मागे सोडलेल्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर येत राहतात. मला काही रिजेक्शनचा देखील सामना करावा लागला आणि काही म्युझिक व्हिडीओना मी नाही म्हटले.'6 / 7'मला वाटते जे काही घडले ते एका कारणासाठी घडले आणि कदाचित माझ्यासाठी दुसरे काहीतरी चांगले होईल.' 'बिग बॉस 14' नंतर निक्की तांबोळी रोहित शेट्टीच्या शो 'खतरों के खिलाडी 11' मध्ये देखील दिसली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 7 / 7निक्की तांबोळी ही साउथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती बऱ्याचदा आपल्या ग्लॅमरस स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेते. सलमान खान (Salman Khan)ने होस्ट केलेल्या रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये ती तिच्या लूकवर खूप काम करत होती. आणखी वाचा Subscribe to Notifications