"मी बर्बाद झाले, स्वत:चा द्वेष करू लागले.." नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने सांगितली व्यथा म्हणाली, “पीडितेसारखं…” By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 1:38 PM1 / 10अभिनेत्री, मॉडेल आणि टीव्ही अँकर शोनाली नागराणी(Shonali Nagrani) पती शिराज भट्टाचार्यपासून विभक्त झाली आहे. शिराज हा फोटोग्राफर आणि सिनेमॅटोग्राफर आहे. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 10 शोनालीने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की ती चार वर्षांपूर्वी पतीपासून वेगळी झाली आहे. पतीपासून विभक्त झाल्यानंतर शोनालीचे काय झाले याचे बोचरे दुःख तिने शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 10'बिग बॉस सीझन 5' मध्ये दिसलेली शोनाली नागराणीने 2013 मध्ये शिराजसोबत लग्न केले होते. त्यांचं नातं 6 वर्षांतच संपलं आणि 2019 मध्ये ते वेगळे झाले. (फोटो इन्स्टाग्राम) 4 / 10एका मुलाखतीत शोनालीने पतीपासून विभक्त झाल्याबद्दल वेदना व्यक्त केल्या आहेत. यासोबतच असंही म्हटलं आहे की, तिला तिच्या पतीपासून वेगळे होणे सोपे नव्हते.(फोटो इन्स्टाग्राम) 5 / 10शोनाली म्हणाली, 'मी आणि माझ्या पती फेब्रुवारी 2019 मध्ये वेगळे झालो आणि घटस्फोटाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे.' (फोटो इन्स्टाग्राम) 6 / 10 'एका वेळ अशी होती की, मी भावनिकदृष्ट्या उध्वस्त झाले होते आणि माझ्याकडे अजिबात एनर्जी उरलेली नाही, ज्याने मी माझं काम करुन शकेन. मी स्वतःचा द्वेष करू लागले. हसणारी जुनी शोनाली केव्हा गायब झाली ते कळलंच नाही.' (फोटो इन्स्टाग्राम) 7 / 10शोनाली पुढे म्हणाली, “मग मला समजले की माझ्याकडे एक पर्याय आहे. पीडित म्हणून जगावं किंवा विखुरलेल्या गोष्टी उचलण्यावर लक्ष केंद्रित करणे.'' (फोटो इन्स्टाग्राम) 8 / 10''मी स्वतःला यातून बाहेर काढण्याची सुरुवात केली आणि नकारात्मक गोष्टींना सकारात्मकपणे पाहू लागले.'' (फोटो इन्स्टाग्राम) 9 / 10 शोनाली म्हणते की ती 4 वर्षांपासून सिंगल आहे. तिला तिच्या आयुष्यात जोडीदाराची उणीव भासते, पण ती क्षणभरच असते. (फोटो इन्स्टाग्राम) 10 / 10 सोनालीने पुढे सांगितले की, लग्नानंतर ती ५ वर्षे काम नाही केलं. पतीपासून विभक्त झाल्यानंतर कामावर परतणे कठीण होते. एक वेळ अशी आली जेव्हा शोनाली इतकी तुटली की मुंबई सोडून तिने गोव्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिला कास्टिंग डायरेक्टरचा फोन आला आणि 'तांडव' ही वेबसिरीज मिळाली. (फोटो इन्स्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications