Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस मराठी'चा 'दे धक्का'! नवं सीझन, नवी मजा; हे आहेत यंदाचे १६ स्पर्धक! By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 9:03 PM1 / 15बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमध्ये घरात पहिलं पाऊल ठेवण्याची संधी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) हिला प्राप्त झाली आहे. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ही गेली १४ वर्ष मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. 'झी मराठी'वरील 'देवमाणूस' मालिकेत तेजस्विनी आमदार बाईंच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. याच भूमिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली. याशिवाय तिनं चिनू, गुलदस्ता यांसारख्या चित्रपटातही काम केलं आहे.2 / 15डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेतून सर्वांचं लक्ष वेधून घेतलेला अभिनेता प्रवाद जवादे 'बिग बॉस'च्या घरातील दुसरा स्पर्धक ठरला आहे. दमदार नृत्य सादर करत जवादे घरात दाखल झाला.3 / 15'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेत मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री अमृता धोंगडे घरात दाखल झाली आहे. 4 / 15'झी मराठी'वरील 'माझी तुझी रेशीम गाठ' मालिकेत 'अविनाश'ची भूमिका साकारलेला अभिनेता निखिल राजेशिर्के देखील 'बिग बॉस'मध्ये आपलं नशीब आजमवणार आहे. 5 / 15MTV वरील लोकप्रिय splitsvilla शोमध्ये स्पर्धक राहिलेली समृद्धी जाधव बिग बॉस मराठी सीझन-४ मधील सहावी स्पर्धक ठरली आहे. ग्लॅमरस समृद्धीनं बिग बॉसमध्ये आपल्या दिलखेच अदांनी सर्वांना घायाळ करणारा डान्स करत धडाक्यात एन्ट्री घेतली आहे. आता घरात ती कुणाकुणाला घायाळ करते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.6 / 15किरण माने हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. अनेक गाजलेले चित्रपट, मालिका यांच्या माध्यमातून ते कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहिले. परंतु, गेल्या काही काळापासून ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहिले आहेत. आता ते बिग बॉसच्या घरात दाखल झाले आहेत.7 / 15मराठी टेलिव्हिजन मालिका विश्वात 'बे दुणे दहा' मालिकेतून एन्ट्री घेतलेला अक्षय केळकर देखील यंदा बिग बॉसमध्ये दिसणार आहे. अक्षयनं काही जाहिरातींमध्येही काम केलं आहे. तसंच 'माधुरी', 'कॉलेज कॅफे' या मराठी सिनेमातही तो झळकला आहे.8 / 15'रात्रीस खेळ चाले' मालिकेत 'शेवंता'च्या भूमिकेतून सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर देखील 'बिग बॉस'च्या घरात दाखल झाली आहे.9 / 15बिग बॉस मराठीच्या आजवरच्या सीझनमधील सर्वात उंच स्पर्धक म्हणून योगेश जाधव ओळखला जाणार आहे. योगेश जावध मूळचा अकलूजचा असून तो एक प्रोफेशनल फायटर आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात आता तो कुणाकुणाशी 'फाइट' करताना दिसणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.10 / 15बोल्ड अँड ब्युटीफूल अभिनेत्री अमृता देशमुख बिग बॉस मराठी सीझन-४ मध्ये आपलं नशीब आजमवण्यासाठी दाखल झाली आहे. अमृतानं मराठी टेलिव्हिन विश्वात 'तुमचं आमचं सेम असतं' या मालिकेतून एन्ट्री घेतली होती. तसंच 'पुढचं पाऊल', 'अस्मिता' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्येही ती झळकली आहे.11 / 15'रंग बदलती ओढणी', 'चंद्रगुप्त मौर्य', 'सावधान इंडिया', 'आरंभ', 'क्राइम पेट्रोल' यासह अनेक हिंदी मालिकेत काम केलेली अभिनेत्री यशश्री मसुरकर देखील यंदाच्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून दाखल झाली आहे.12 / 15अनेकांना आपल्या तालावर थिरकवणाऱ्या 'डान्सिंग सुपरस्टार' विकास सावंतचीही बिग बॉसमध्ये एन्ट्री झाली आहे. विकास सावंत कोरिओग्राफर असून त्यानं आपल्या हटके डान्स स्टाइलनं आपलं नाव कमावलं आहे.13 / 15बिग बॉसनं यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत एका सर्वसामान्य प्रेक्षकालाही घरात एन्ट्री दिली आहे. त्रिशुळ मराठे याला एअरटेलच्या लकी कॉल एन्ट्रीच्या माध्यमातून स्पर्धक होण्याची संधी प्राप्त झाली आहे.14 / 15मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मेघा घाडगे हिनंही बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे आता यंदाही बिग बॉसच्या घरात लावणीचा मराठमोळा ठसका पाहायला मिळणार आहे.15 / 15'माझ्या नवऱ्याची बायको' या गाजलेल्या टेलिव्हिजन मालिकेत माया नावाचं पात्र साकारलेली अभिनेत्री रुचिरा जाधव दाखल झाली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे रुचिरा बिग बॉसमध्ये एकटीच दाखल झालेली नाही. तर तिनं तिच्या प्रियकरासोबत घरात एन्ट्री घेतली आहे. डॉ. रोहित शिंदे बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दाखल झाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications