Join us  

Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी'च्या घरात सेलिब्रेट झाला निक्कीचा वाढदिवस, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 1:50 PM

1 / 8
'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्या दिवसापासूनच निक्की तांबोळी चर्चेत आहे. हिंदी बिग बॉस गाजवून आलेली निक्की बिग बॉस मराठीचं घर डोक्यावर घेताना दिसते.
2 / 8
नुकतंच निक्कीचा वाढदिवस होता. बिग बॉस मराठीच्या घरात निक्कीला तिच्या वाढदिवशी खास सरप्राइज मिळालं.
3 / 8
बिग बॉस मराठीच्या घरातील सर्व सदस्यांनी मिळून निक्कीचा वाढदिवस साजरा केला.
4 / 8
बिग बॉसच्या घरात केक कापून निक्कीचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यात आला. याचे काही फोटो समोर आले आहेत.
5 / 8
निक्कीच्या वाढदिवसानिमित्त का होईना पण घरातील दोन्ही टीम एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
6 / 8
वाद विसरून आणि हेवे दावे सोडून घरातील सदस्यांनी निक्कीचा वाढदिवस साजरा केला.
7 / 8
अरबाजने टास्कदरम्यान निक्कीला त्याची कॅप्टन्सी देत वाढदिवसाचं मोठं गिफ्ट दिलं. त्यामुळे बर्थडेबरोबरच निक्कीला घराची कॅप्टन होण्याचा मान मिळाला.
8 / 8
निक्की ही घरातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सदस्यांपैकी एक आहे. कॅप्टन झाल्यामुळे या आठवड्यात निक्की सेफ आहे.
टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार