निक्कीसोबतच्या जवळीकीचा अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडला होतोय त्रास, थेट नाव घेत म्हणाली... By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 11:03 AM1 / 10'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातील स्पर्धक निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाज पटेल (Arbaz Patel) यांच्यात प्रेमाचे वारे वाहताना पाहायला मिळाले होते. पण, यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडणही झालं. 2 / 10या भांडणानंतर भाऊच्या धक्क्यावर पाहुण्यांसोबत बोलताना अरबाजने तो सिंगल नसून कमिटेड असल्याचं जाहीर केलं होतं. 3 / 10 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांनी निक्की आणि अरबाजला एकमेकांपासून दूर ठेवायचा प्रयत्न केला. पण, निक्कीपासून दूर राहणं अरबाजला जमत नाहीये आणि त्याला करमतही नसल्याचं दिसून आलं. 4 / 10अरबाजची गाडी फिरून-फिरून निक्कीकडे येत असल्याचं पाहायला मिळालं. अखेर अरबाजने निक्कीजवळ माफी मागितली. अशातच अरबाजच्या कथित गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.5 / 10अरबाजच्या कथित गर्लफ्रेंडचं नाव लीझा बिंद्रा आहे. तिच्या या पोस्टने आता नव्याने चर्चांना उधाण आले आहे.6 / 10 लीझा बिंद्राने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली आहे. त्यात तिने अरबाजचा उल्लेख केला. 7 / 10 लीझाने स्टोरीवर स्वतःचा एक सेल्फी पोस्ट केला. त्यावर तिने लिहले, 'प्लीज मला अरबाजशी संबंधित कोणतेही मेसेज किंवा कमेंट करू नका'.8 / 10 लीझाच्या या पोस्टवरुन तिने अरबाजसोबतचे सर्व संबंध तोडले असल्याचं बोललं जात आहे. अरबाजने निक्कीशी साधलेली जवळीक हे त्यांच्या ब्रेकअपचं कारण असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला आहे. 9 / 10लीझा आणि अरबाज पटेल बऱ्याच काळपासून सोबत आहेत. एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेले आहेत. अरबाजची गर्लफ्रेंड लीझा ही मॉडेल, कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर आहे. ती दुबईत राहते. 10 / 10आता अरबाज हा आधीच एका रिलेशनशिपमध्ये असताना आता तो निक्कीसोबत असा का वागत आहे, असा प्रश्न प्रेक्षकांना प्रेक्षकांना पडला आहे. तो नक्की कोणाला फसवतोय याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications