Join us  

वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 11:34 AM

1 / 8
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा हा शेवटचा आठवडा आहे. हा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे.
2 / 8
रविवारी पंढरीनाथ कांबळेने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला. पण, पॅडीने बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतल्याने मात्र प्रेक्षक नाराज आहे.
3 / 8
पॅडीचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपल्यानंतर कलर्स मराठीच्या ऑफिशियल पेजवरुन एक पोस्ट टाकण्यात आली होती. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
4 / 8
अनेकांनी वर्षा उसगावकर घराबाहेर जायल्या हव्या होत्या, असं म्हटलं आहे. तर काहींनी बिग बॉसला unfair म्हटलं आहे.
5 / 8
'कुणा कुणाला वाटत वर्षा ताई जायला पाहिजे होत्या', 'कुणा कुणाला वाटत हे चुकीच झालं पॅडी दादा खूप छान खेळतात', अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
6 / 8
'कुणा कुणाला वाटत वर्षा ताई जायला पाहिजे होत्या', 'कुणा कुणाला वाटत हे चुकीच झालं पॅडी दादा खूप छान खेळतात', अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
7 / 8
सुरुवातीला घरात पॅडीचा गेम दिसला नव्हता. पण, भाऊच्या धक्क्यावर रितेशने दिलेल्या सल्ल्यानंतर मात्र पॅडीने त्याचा गेम दाखवण्यास सुरुवात केली.
8 / 8
पॅडीने त्याच्या उत्तम खेळीने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली होती. त्यामुळे त्याला प्रेक्षक टॉप ५मध्ये पाहत होते. आता घरातील सदस्यांपैकी कोण 'बिग बॉस मराठी'च्या ट्रॉफीवर नाव कोरणार, हे पाहावं लागेल.
टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारमराठी अभिनेतावर्षा उसगांवकर