Join us  

'बिग बॉस मराठी ५'मधील गायक अभिजीत सावंतची पत्नी काय करते? पाहा फॅमिली फोटोज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 5:44 PM

1 / 7
मराठमोळा गायक अभिजीत सावंत हा इंडियन आयडॉल सीझन १ चा विजेता आहे. अभिजीत बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये सहभागी झालाय.
2 / 7
अभिजीत सावंतने 'मोहब्बते लुटाऊंगा' या गाण्यावर 'बिग बॉस मराठी ५'मध्ये एन्ट्री घेतली.
3 / 7
अभिजीत सावंतचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं असून त्याला दोन मुली आहेत. अभिजीतच्या सोशल मीडियावर त्याचे कुटुंबासोबतचे फोटो दिसून येतात.
4 / 7
अभिजीतच्या पत्नीचं नाव आहे शिल्पा एडवणकर-सावंत. शिल्पाचा स्वतःचा केकचा व्यवसाय असून अस्मी नावाने हा बिझनेस करते.
5 / 7
अभिजीतच्या दोन मुलींचं नाव आहे समीरा आणि आहाना. अभिजीत काही महिन्यांपूर्वी पत्नी अन् मुलींना घेऊन परदेश सफरीवर गेलेला
6 / 7
अभिजीत सावंत हा ४२ वर्षांचा असून त्याने दादरच्या राजा शिवाजी विद्यालयातून शिक्षण घेतलंय
7 / 7
सूरांची जादू करणारा अभिजीत सावंत 'बिग बॉस मराठी ५'मध्ये काय कल्ला करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.