Join us  

सिनेमात घालायला लावला स्वीमसूट अन् वर्षा उसगावकरांनी काढला पळ; नेमकं काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 3:41 PM

1 / 7
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'बिग बॉस मराठी ५'मध्ये ९०चं दशक गाजवलेल्या अभिनेत्री वर्षा उसगावकर सहभागी झाल्या आहेत.
2 / 7
या दिग्गज अभिनेत्रीने अभिनय आणि सौंदर्याने सिनेसृष्टीतील एक काळ गाजवला. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. मराठीबरोबरच त्यांनी हिंदी आणि साऊथ सिनेमांमध्येही काम केलं.
3 / 7
पण, एका साऊथ सिनेमात स्विमसूट घालायला सांगितल्याने वर्षा उसगावकर यांनी सेटवरुन पळ काढला होता. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला होता.
4 / 7
गंमत जंमत सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर वर्षा उसगावकर यांना अर्जुन या कन्नड सिनेमाची ऑफर होती. या सिनेमात त्या सुपरस्टार अंबरिश यांच्याबरोबर काम करणार होत्या.
5 / 7
या सिनेमात वर्षा यांना स्विमिंगसूटमध्ये अंबरीश यांच्याबरोबर एक गाणं करायचं होतं. पण, स्वीमसूट घालायला लागेल हे ऐकूनच त्यांना घाम फुटला होता.
6 / 7
त्यानंतर वर्षा यांनी दिग्दर्शकाला मी शॉर्टस घालू शकते. पण, स्वीमसूट नाही असं सांगितलं. पण, स्वीमसूट घालण्यावर दिग्दर्शक ठाम होते. स्वीमसूटचं ऐकल्यानंतर वर्षा यांनी त्यांच्या आईबरोबरच लगेचच दुसऱ्या दिवशी फ्लाइटने घर गाठलं.
7 / 7
पण, स्वीमसूट घालायला सांगितल्यामुळे सिनेमा सोडल्यानंतर वर्षा यांना त्यांच्या वडिलांचा ओरडा खावा लागला होता. 'चित्रपटात काम करायचं ठरवलं आहेस तर हे करायला हवं होतंस. नाही का म्हणालीस? तुझी तयारी पाहिजे होती', असं त्यांचे वडील म्हणाले होते.
टॅग्स :वर्षा उसगांवकरबिग बॉस मराठीसेलिब्रिटी