Join us  

बॉयफ्रेंडसोबत 'बिग बॉस'च्या घरात घेतलेली एन्ट्री, पण...; फोटोतील या बोल्ड अप्सरेला ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 10:39 AM

1 / 9
सध्या सर्वत्र 'बिग बॉस मराठी'ची चर्चा आहे. बिग बॉस मराठीचा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉस मराठी ४ मध्ये मराठी अभिनेत्री तिच्या बॉयफ्रेंडबरोबर सहभागी झाली होती.
2 / 9
ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून रुचिरा जाधव आहे. रुचिरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
3 / 9
अनेकदा रुचिरा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकतंच तिने क्रुझवरील काही फोटो शेअर केले आहेत.
4 / 9
यामध्ये रुचिराचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. रुचिराने ब्रालेट टॉप आणि पँटमध्ये हे फोटोशूट केलं आहे.
5 / 9
फोटोशूटसाठी तिने बोल्ड पोझही दिल्या आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
6 / 9
रुचिराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
7 / 9
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून रुचिराला प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेने तिला एक नवी ओळख मिळवून दिली.
8 / 9
रुचिरा काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या बाबू सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिने अंकित मोहनबरोबर स्क्रीन शेअर केली होती.
9 / 9
रुचिराने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'ठरलं तर मग' मालिकेतही ती दिसली होती.
टॅग्स :टिव्ही कलाकारबिग बॉस मराठी